Congress Rally News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने परभणीत काढण्यात आलेल्या सद्भावना आणि संविधान बचाव रॅलीचा आज समारोप झाला. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांच्यासह राज्यभरातील काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते. उपस्थिताना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जातीनिहाय जनगणनेमुले मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, असा विश्वास व्यक्त केला.
तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत असून यापुढेही राज्यात अशाच यात्रा काढण्यात येतील, असे रमेश चेन्नीथला म्हणाले.
सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्यावर झालेल्या अन्याय झाला त्यावर राहुल गांधी यांनी आवाज उठवला, या घटनेला तीन महिने झाले तरी तरी अद्याप सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर सरकारने कोणतीच कारवाई केलेली नाही, मुख्यमंत्री फडणीस यावर काही बोलत नाहीत. (Congress) राज्यात कायदा सुव्यवस्था नाही, राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायासाठी जातीजनगणनेचा मुद्दा उपस्थित केला, याचा फायदा मागास, वंचित, पीडित लोकांना होईल.
जातनिहाय जनगणनेचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा भाजपा व मोदी यांनी त्याला विरोध केला पण शेवटी मोदी सरकारला जनगणनेचा निर्णय घ्यावाच लागला. मोदींवर जनतेचा विश्वास राहिला नाही, महिला आरक्षण विधेयक पास केले पण त्याची अंमलबजवाणी केली नाही. जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला पण तो कधी होईल हे जाहीर करत नाहीत, अशी टीका चेन्नीथाला यांनी आपल्या भाषणात केली. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरल्याने मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. जातनिहाय जनगणना झाली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल.
ओबीसीला 27 टक्के आरक्षण आहे ते सुद्धा 65 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. भाजपा जाती जातीत भांडणे लावत आहे, अशावेळी बहुजन समाज एकत्र असणे ही काळाची गरज आहे राज्यात रोज सहा शेतकरी आत्महत्या होत आहेत, मुलांना नोकरी मिळत नाही आणि सरकारला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून अदानी अंबानींचे हित महत्वाचे वाटत आहे. गरज नसताना 88 हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यास सरकार प्राधान्य देत आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला.
दुभंगलेली मने जोडण्याचे काम
सद्भावना यात्रेच्या माध्यमातून दुभंगलेली मने जोडण्याचे काम केले जात आहे, समाजा-समाजाला जोडण्याचे काम होत आहे. भाजपा 2014 पासून देशात व राज्यात जातीयतेचे व धर्मांधतेचे विष पेरत आहे. आता भाजपा नेते काँग्रेस फोडण्याची भाषा करत आहेत. दुसऱ्याची घरे फोडण्याची सवय भाजपाला लागली आहे. आमची वेळ आल्यावर याचा बदला घेऊ. काही लोक पक्ष सोडून जात आहेत पण दुसर्याच्या मागे चालण्यापेक्षा स्वत:चा रस्ता स्वत: तयार करा, असे आवहन विजय वडेट्टीवार यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.