CBSE : CBSE चा धक्कादायक निर्णय! अभ्यासक्रमात मोठे बदल; गुणपत्रिकेबद्दल नवे नियम

CBSE Board Education Policy : सीबीएसई बोर्डाचा नवीन शिक्षणक्रम जाहीर करण्यात आला असून नवीन शिक्षण क्रमानुसार तीन भाषा विषय सक्तीचे करण्यात आले आहेत.
CBSE Board Education Policy
CBSE Board Education Policysarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. CBSE बोर्डाने सहावीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. नववीपासून गणित आणि विज्ञान विषयांना द्विस्तरीय रचना लागू करण्यात येणार आहे.

  3. या बदलांमुळे विद्यार्थ्यांना अधिक लवचिक आणि समजण्यास सोपी शिक्षण पद्धती मिळणार आहे.

Mumbai News : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मोठा निर्णय घेत नवीन शिक्षणक्रमही जाहीर केला आहे. या निर्णयानुसार पुढील वर्षी पासून इयत्ता सहावी वर्गासाठी तीन भाषा विषय सक्तीचे करण्यात आले असून तीन पैकी दोन भारतीय भाषा असतील. तसेच बोर्डाने इयत्ता नववी पासून गणित आणि विज्ञानामध्ये द्विस्तरीय रचनेचा अवलंब केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता तीन भाषांमध्ये दोन भारतीय आणि तिसरी भाषा 42 भाषांपैकी एक भाषा निवडावी लागणार आहे.

बोर्डाने घेतलेला निर्णय पुढील वर्षीपासून लागू होणार असून इयत्ता सहावीपासून बोर्डाच्या शाळांमध्ये तीन भाषा नियम लागू होईल. पण परदेशातून भारतीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू नसेल. तर मंडळाने पुढील वर्षीपासूनच गणित आणि विज्ञानासाठी द्विस्तरीय रचनेचा अवलंब केला आहे.

ज्यामध्ये नेहमीच्या ऐंशी गुणांच्या परीक्षा व्यतिरिक्त आणखी एक पर्याय दिला जाईल. जी परीक्षा 25 गुणांची संबंधित विषयाच्या आकलन क्षमतेवर असेल. तर हे गुण एकूण गुणात न घालता त्याची नोंद गुणपत्रिकेवर वेगळी करण्यात येणार आहे.

CBSE Board Education Policy
CBSE Board Exam: दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय, काय आहे नवा नियम

आतापर्यंत, मोर्डाच्या अनेक शाळांमध्ये केवळ दोन भाषा अनिवार्य केल्या होत्या. पण आता नवीन धोरणानुसार, विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त भाषा शिकावी लागणार आहे. यामुळे अभ्यासाची व्याप्ती वाढणार असून विद्यार्थ्यांना नवीन भाषा शिकण्यासह ती समजून घ्यावी लागणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने 'इंटरनॅशनल, ग्लोबल, वर्ल्ड' अशी आकर्षक नाव देऊन पालक, विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या बोगस शाळांना दणका दिला आहे. अशा नावांबाबत सरकारने नवी नियमावली बनवली आहे.

तर नवीन शाळा सुरू करताना आता सर्रास असे शब्द वापरता येणार नाहीत. तसेच दर्जावाढसाठी अर्ज करताना विद्यमान शाळांचीही छानणी होणार आहे. तसेच या शाळांमध्येही बोगस प्रकार आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.

CBSE Board Education Policy
CBSE Shivaji History Cut Controversy : आमदार तांबेंनी मंत्री भोयर यांचं खोटं पकडलं; चुकीचं उत्तर देताच भर सभागृहात झापलं!

FAQs :

Q1. CBSE चा नवीन अभ्यासक्रम कधी लागू होणार?
👉 नवीन अभ्यासक्रम 2026 पासून टप्प्याटप्प्याने लागू होण्याची शक्यता आहे.

Q2. तीन भाषा नियम कोणत्या वर्गापासून लागू आहे?
👉 सहावी इयत्तेपासून तीन भाषा शिकवण्याचा नियम लागू होणार आहे.

Q3. गणित आणि विज्ञानात काय बदल झाले आहेत?
👉 नववीपासून गणित आणि विज्ञान विषयांना द्विस्तरीय स्तर देण्यात येणार आहे.

Q4. या बदलांचा विद्यार्थ्यांना काय फायदा होईल?
👉 विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार विषय निवडण्याची संधी मिळेल.

Q5. हा बदल सर्व CBSE शाळांसाठी लागू आहे का?
👉 होय, CBSE अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये हे बदल लागू होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com