'तर... मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता'

भाजप (BJP) हे सॉफ्ट टार्गेट होतं, काही झालं की भाजपचा हात आहे बोललं जातं.
chandrakant Patil
chandrakant Patil
Published on
Updated on

मुंबई : ''भाजप (BJP) हे सॉफ्ट टार्गेट होतं, काही झालं की भाजपचा हात आहे बोललं जातं. अमरावतीत (Amaravti) परवाच्या तोडफोडीत कोणाचा हात होता? कालची प्रतिक्रिया हिंदू मार नही खायेगा अशीच होती. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हे चालणार नाही हेच शिकवलं. 1993 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंसाठी पुढाकार घेतला नसता तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता, आता हिंदुहृदयसम्राट यांचे वारसदार काही बोलणार नाही का?' अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakanat Patil) यांनी अमरावती हिंसाचाराबाबत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (Vasanat Dada Suger Institute) केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा भेट देणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर उद्योगात बेसिक संशोधन करणारी इन्स्टिट्यूट आहे. मी सत्तेत असताना मी ही बराच वेळा भेट दिली आहे. अमित शहा हे सहकार मंत्री असल्यामुळे ते इन्स्टिट्यूटला भेट देऊ शकतात. त्यात काहीही चुकीचे नाही, असे म्हणत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही. पवारांनी पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली चांगली संस्था आहे. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

chandrakant Patil
'साठ वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांकडून पहिल्यांदाच विलीनीकरणाची मागणी'

त्याचबरोबर, अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात वसंतदादा शुगर इस्न्टिट्यूटच्या भेटीचा समावेश आधीच करण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी केंद्रात स्थापन झालेल्या सहकार खात्याची जबाबदारी अमित शहांकडे देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सहकार चळवळीचा जोर आहे. महाराष्ट्रात दौऱ्यात शहा सहकार क्षेत्राची माहिती घेणार असल्याचेगही त्यांनी वेळी सांगितले.

याचवेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याच आवाहन केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं तसे मी पण आवाहन करतो, आत्महत्या आत्मदहन हा पर्याय नाही, आत्महत्या करु नका, अंसही त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन केलं. 'मला त्यांचा खूप अभिमान आहे. नक्षलवाद ही आपल्या समाजाला लागलेली किड आहे. ही कीड समाजातून उखडून फेकली पाहिजे. नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात यायचं असेल तर त्यांनीही शरण आलं पाहिजे. सामान्य जीवन जगलं पाहिजे, अशीच राज्य किंवा केंद्राची भूमिका असते. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीसांनी केलेल्या कारवाईसाठी मी त्यांचं अभिनंदन करतो.” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com