Chandrapur News : प्रशासनाचे मतदारांना प्रलोभन; जिंका बाइक, सायकल आणि मोबाईल !

Lok Sabha 2024 Voting Updates : मतदान करण्यासाठी राजकीय पक्ष मतदारांना प्रलोभनं दिल्याचे आतापर्यंत तुम्ही पाहिले असेल. पण, पहिल्या टप्प्यातील एका लोकसभा मतदारसंघात थेट जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी प्रलोभनं अर्थात बक्षिसे जाहीर केली आहेत.
Chandrapur Politics.
Chandrapur Politics.Sarkarnama

Chandrapur Lok Sabha Election 2024 : देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी मतदान करून आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेमध्ये नोंदविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून, सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.

Chandrapur Politics.
Supriya Sule Debt : सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रावहिनींचं 55 लाख रुपयांचं कर्ज

या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे जिंका’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 19 एप्रिल रोजी मतदान करून सेल्फी अपलोड करावा लागणार आहे.

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने द्वारे देण्यात येणारे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने द्वारे देण्यात येणारे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस Sarkarnama

पहिल्या तीन क्रमांकाचे आकर्षक बक्षिसे लाखोंची आहेत. प्रथम बक्षीस 1 लक्ष 60 हजार रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची अपाची आरटीआर – 140, 4 व्ही बाइक,आरटीओ आणि विमा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे.

इतर बक्षिसांमध्ये 91 मिराकी ई-सायकल ज्यांची किंमत 35 हजार आणि सॅमसंग ॲन्ड्राइड फोन ज्याची किंमत 20 हजार आहे. त्याचे बक्षीस देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत मतदार असणे आवश्यक आहे. 19 एप्रिल 2024 रोजी यशस्वीरित्या मतदान करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ही अभिनव स्पर्धा प्रशासनाने आणली आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुकांनी मतदानाच्या दिवशी सेल्फी घ्यावा आणि तो दिलेल्या गुगल फॉर्मवर अपलोड करावा. येथे दिलेला क्यूआर कोडदेखील त्यात प्रवेश करण्यासाठी स्कॅन केला जाऊ शकतो. सेल्फी हा स्पष्ट आणि फिल्टर न केलेला कलर फोटो असावा.

सेल्फीमध्ये स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीचा चेहरा, त्याचे/तिचे बोट अमिट शाईने (मतदान केल्यानंतर चिन्हांकित) दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करा. सेल्फी 20 एप्रिल 11.59 पीएम पूर्वी अपलोड करणे आवश्यक आहे.

अंतिम मुदतीनंतर प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. 20 एप्रिल रोजी एक संगणकावर आधारित अल्गोरिदमिक लकी ड्रॉ काढण्यात येईल, जेणेकरून विजेते आणि चार प्रतीक्षा यादीतील उमेदवार घोषित केले जातील.

निवडून आलेल्या विजेत्याला त्याचे फोटो ओळखपत्र, व्होटर स्लिप आणि पॅन कार्ड सादर करण्यासाठी 23 एप्रिल, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तीन दिवसांचा वेळ दिला जाईल. असे करण्यात अयशस्वी झाल्यास प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवाराला संधी दिली जाईल.

या स्पर्धेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होऊन लोकशाही प्रक्रियेला बळकट करा आणि बक्षीसे जिंका, असे आवाहन जिल्हा निवडणूक आधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

युवा मतदारांकरिता रिल्स, पोस्टर्स व मिम्स स्पर्धा

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘माय व्होट इज माय फ्युचर : पावर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स, पोस्टर्स मेकिंग व मिम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून, सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल.

18 वर्षांवरील प्रथम मतदार मोठ्या संख्येने असल्याने व युवकांमध्ये रिल्स, पोस्टर व मिम्सचे विशेष आकर्षण असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांकरिता विशेष रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.

रिल्स स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला प्रथम बक्षीस 15 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 10 हजार तर तृतीय बक्षीस 5 हजार रुपये दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे पोस्टर्स स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 5 हजार, द्वितीय 3 हजार तर तृतीय बक्षीस 2 हजार रुपये आहे. तसेच मिम्स स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार तर तृतीय बक्षीस 2 हजार रुपये देण्यात येणार आहे.

R

Chandrapur Politics.
Devendra Fadnavis News : सांगलीत फडणवीस - संंभाजी भिडे यांच्यात 'गुफ्तगू'; संजयकाकांसाठी फिल्डिंग की...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com