

Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत. मात्र, महापौर पदासाठी जुळवाजुळवा सुरु आहे. काही ठिकाणी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच चंद्रपूरमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा व वंचित बहुजन आघाडीचे दोन व काँग्रेसच्या बंडखोर दोन असे एकूण दहा नगरसेवकांनी वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यांनतर रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील रणनीती आखली आहे. त्यामुळे आता येत्या काळात भाजप व काँग्रेसच्या वादात उद्धव ठाकरेंचा लाभ होण्याची शक्यता आहे. 'मातोश्री'वरील बैठकीत महापौर पदाबाबत निर्णय झाला असून अडीच वर्षांच्या हट्टावर नगरसेवक ठाम आहेत. त्यामुळे आता त्याकडे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस (Congress) मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे 23 नगरसेवक आले आहेत. त्यामुळे आता भाजप व काँग्रेसमध्ये बहुमताचा 34 चा आकडा गाठण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटात महापौर पदावरून रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही गट मीच किंगमेकर म्हणत आहेत.
भाजपमध्ये (BJP) सध्या दोन गट आहेत. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यात महापौर पदावरून जोरदार जुगलबंदी सुरु आहे. दोघांपैकी एकजणही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे भाजप व काँग्रेसमध्ये फारसे आलबेल दिसत नसल्याने त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेचे सहा व वंचित बहुजन आघाडीचे दोन व काँग्रेसच्या बंडखोर दोन असे एकूण दहा नगरसेवकांनी एकत्र येत सर्वाना धक्का दिला आहे.
या दहा जणांच्या गटाने शनिवारी वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. तर त्यानंतर रविवारी मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या दहा नगरसेवकांनी भेट घेऊन पुढील रणनीती ठरवली आहे. त्यामुळे आता येत्या काळात भाजप व काँग्रेसच्या वादात उद्धव ठाकरेंचा लाभ होण्याची शक्यता असून त्यांच्या शिवसेनेचा महापौर होण्याची चिन्हे आहेत.
चंद्रपूरमधील महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि वंचितने युती केली होती. या युतीचे 8 नगरसेवक निवडून आले आणि 2 अपक्ष यांनी समर्थन दिले आहे. अद्याप या दहा जणांचा गट स्थापन झालेला नाही. सर्व काही मिळूनही काँग्रेस चाचपडत आहे. अडीच वर्ष महापौर आमचा असेल आणि जर नाही तर अडीच वर्ष उपमहापौर आणि स्टँडिंग आमचा असेल. याबाबतचा सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरे घेतील. भाजपसोबत जाण्यासाठीही आमचा हाच फॉर्म्युला असणार असल्याचे नगरसेवक प्रशांत कदम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना महापौर पदावर ठाम दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.