Bawankule on MVA : 'महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे एकूण 18 मुख्यमंत्री फिरताय'; बावनकुळेंनी लगावला टोला!

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि शरद पवारांसमोर मुख्यमंत्रिपदासाठीचा कटोरा घेवून फिरत आहेत, अशी टीकाही केली आहे.
Chandrashekhar Bawankule and MVA
Chandrashekhar Bawankule and MVASarakarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule Vs Mahavikas Aghadi : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कायमच महाविकास आघाडीवर विविध मुद्य्यांवरून टीका करत असतात. यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे त्यांच्या निशाण्यावर दिसतात. आता बावनकुळेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीत असणाऱ्या मतमतांतरावरून टोला लगावला आहे.

मीडियाशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) म्हणाले, 'बाकी काही मला माहिती नाही, पण एवढं नक्की माहीत आहे, की शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याचीच योजना तयार केलेली आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि शरद पवारांसमोर मुख्यमंत्रिपदासाठीचा कटोरा घेवून फिरत आहेत. काँग्रेसध्ये आठ मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरत आहेत. महाराष्ट्रात एकुण महाविकास आघाडीचे १८ मुख्यमंत्री फिरत आहेत. एवढं मला माहीत आहे. पण शरद पवारांची जिद्द आहे, काही झालं तरी यावेळी काही ऐकायचं नाही सुप्रिया आजींना मुख्यमंत्री करायचं आहे. हे खरंय की माहीत नाही, पण मला माझी जी माहिती आहे ती अत्यंत चांगल्या सूत्रांकडून आहे.'

Chandrashekhar Bawankule and MVA
Rajendra Yadravkar : राजेंद्र यड्रावकरांनी महायुतीला दिला आणखी एक धक्का; आता थेट..!

तसेच 'नाना पटोले(Nana Patole) यांची आरक्षणाबाबतची भूमिका ही जरा मुख्यमंत्री बनण्यापूर्वी बाहेर आली पाहिजे. जरा त्यांना सांगितलं पाहिजे की ओबीसींचं आरक्षण हे राहुल गांधी रद्द करायला निघाले आहेत. मग मुख्यमंत्रिपदाची चर्चा करू. आधी यावर नाना पटोलेंनी उत्तर दिलं पाहिजे.' असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून विविध वक्तव्य, दावे, आरोप, घोषणा सुरू आहेत. अशातच आता सर्वात चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा, ज्यावरून प्रत्येक पक्षाकडून आपल्या नेत्यांची नावं पुढे केली जात आहे. महाविकास आघाडीतही ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांचे नाव पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून घेतले जात आहे. तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादींने मौन बाळगून एकप्रकारे आपली वेगळी भूमिका दर्शवल्याचे दिसत आहे.

Chandrashekhar Bawankule and MVA
Mushrif and Mahadik : महाडिक गट पराभवाचा वचपा काढणार? ; कागलमध्ये महायुतीत खदखद!

दरम्यान काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सुप्रिया सुळे(Supriya Sule) तसेच रश्मी ठाकरेंचे नाव घेत राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याबाबत एक महत्त्वाचे विधान केले होते. यावरूनच आता भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआवर निशाणा साधला आहे. तर महायुतीच्या मुख्यंत्रिदाबाबत बोलातना बावनकुळेंनी सांगितले की, निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com