Mushrif and Mahadik : महाडिक गट पराभवाचा वचपा काढणार? ; कागलमध्ये महायुतीत खदखद!

Hasan Mushrif and Dhananjay Mahadik Politics : 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा महाडिक गट काढणार की पालकमंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी राहणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Mushrif and Mahadik
Mushrif and MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kagal Assembly Constituency : कागल विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची व्होट बँक मजबूत होत असल्याचे बोलेल जात आहे. मात्र जितका पाठिंबा मिळत आहे, तितकाच त्यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांचा गटही आक्रमक झाला आहे. महायुतीत असणारे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा कागलमधील गट नुकताच महाडिक यांची भेट घेऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उतरला आहे.

कागलमधील महाडिक गटाने पालकमंत्री मुश्रीफ यांच्या विरोधातील तक्रारीचा पाढा खासदार महाडिक यांच्यासमोर वाचला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाडिक गट आक्रमक झाल्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा महाडिक गट काढणार की पालकमंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी राहणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Mushrif and Mahadik
Hasan Mushrif : कागलमध्ये महायुतीत बिनसलं? महाडिकांबद्दल काय म्हणाले मुश्रीफ?

महायुतीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे एकत्र असले तरी अंतर्गत वादाचे किनार दूरवर पसरली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक यांनी निवडणूक लढवली असली तरी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघातून महाडिक यांना अधिक फटका बसला होता. जवळपास 70 हजाराचे मताधिक्य शिवसेनेचे मंडलिक यांना होते. इतकेच नव्हे तर गेल्या दहा वर्षात पालकमंत्री मुश्रीफ यांनी महाडिक यांच्या विरोधात केलेल्या कार्याची चर्चा यंदाच्या निवडणुकीत होत आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाडिक यांना उमेदवारी देऊ नये यासाठी पाच आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना पत्र लिहिले होते. या पत्रात देखील मुश्रीफ यांची सही होती. त्याचबरोबर पाच वर्षात महापालिका, गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, बाजार समिती मधील महाडिक गटाची सत्ता हटवण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांनी सतेज पाटलांना साथ दिली आहे. याचा राग महाडिक आणि महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना आहे.

इतकेच नव्हे तर गेल्या पाच वर्षात धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik) गटाच्या कार्यकर्त्यांना कोणत्याच समित्यावर, कारखान्याच्या राजकारणात मुश्रीफ यांनी स्थान दिले नसल्याचा आरोप महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. अशा परिस्थितीत आम्ही मुश्रीफ यांच्या मागे कसे राहायचे? अशा तक्रारी करत वादाला तोंड फोडले आहे. यावेळी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपचे नेते आणि नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार(Sharad Pawar) गटात प्रवेश केलेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे हे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्याकडून घाटगे हे महाडिक यांचे नातेवाईक आहेत. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून मुश्रीफ यांच्या मागे महाडिक यांना राहावे लागणार आहे. पण कार्यकर्त्यांनीच मुश्रीफ यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com