चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा आमदार : महाविकास आघाडीची मते फोडली

कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा धुव्वा
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : नागपूर विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेवारांचा धुव्वा उडवत भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandra shekhar Bawankule) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल ३६२ मते घेऊन बावनकुळे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकस आघाडीची तब्बल ४४ मते फोडून मोठा विजय मिळवला असल्याचे भाजपचे प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे अधिकृत उभे असलेले उमेदवार डॉ. रविंद्र उर्फ छोटू भोयर (Ravindra Bhoyar) यांना केवळ १ मत मिळाले तर कॉंग्रेस पुरस्कृत म॔गेश देशमुख यांना १८६ मत मिळाली. तर भाजपची सुरुवातीपासून ३१८ मत पक्की होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागून राहिलेली निवडणूक आजच्या निकालानंतर मात्र एकतर्फी झाली असल्याचे दिसून येत आहे.

Chandrashekhar Bawankule
राम शिंदेंचा रात्रभर थंडीत मंदिरासमोरच मुक्काम

नागपूर मतदारसंघात मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. सुरुवातीला भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे आयाय उमेदवार डॉ. रवींद्र भोयर अशी लढत होणार होती. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसने उमेदवार बदलला. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण याबाबत मतदार शेवटपर्यंत संभ्रमात होते. देशमुख आणि भोयर यांच्यामधील याच मतविभाजनाचा थेट फायदा बावनकुळे यांना झाला असल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com