Chandrashekhar Bawankule: उद्धव ठाकरेंचा सल्ला ऐकला, आता त्यांनी पत्र द्यावे; बावनकुळे यांचा टोला

Chandrashekhar Bawankule Targets Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना जे सांगायचे आहे ते माध्यमांच्या माध्यमातून सांगू नये. त्यांचे एखादे पत्र वगैरे मिळाले तर त्यांच्या मागण्याचा विचार करू," असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
Uddhav thackeray Chandrashekhar Bawankule
Uddhav thackeray Chandrashekhar Bawankulesarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: राज्यातील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी नेत्यांच्या जिल्हानिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कोणी सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करीत आहेत, कोणी हेक्टरी ५० रुपये देण्याचा सल्ला देत आहे. यात उद्धव ठाकरे यांनीसुद्धा याबाबत एक सल्ला सरकारला दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, "त्यांचा सल्ला आम्ही एकला. आता त्यांनी एक लेखी पत्र द्यावे. नैसर्गिक आपत्तीत एनडीआरएफच्या नियमाप्रमाणेच मदत देण्यात येते. उद्धव ठाकरेंना जे सांगायचे आहे ते माध्यमांच्या माध्यमातून सांगू नये. त्यांचे एखादे पत्र वगैरे मिळाले तर त्यांच्या मागण्याचा विचार करू," असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भाजपच्या आमदारांनी सुद्धा एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे सर्व कार्यकर्ते, खासदार आणि आमदार मदत करणार आहेत. मी स्वतः पालकमंत्री या नात्याने अमरावती व नागपूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. अकोल्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. विभागीय आयुक्तांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. मंडळ अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे काही नुकसान होणार असले तर त्यावर फौजदारी कारवाई करावी, बेजबाबदार अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना माझ्या खात्यामार्फत कडक करावाई केली जाईल, असाही इशारा बावनकुळे यांनी दिला.

Uddhav thackeray Chandrashekhar Bawankule
Bihar Election: 85 वर्षांनंतर CWCची बैठक; तेलंगणाप्रमाणे बिहारमध्ये चमत्कार होणार का?

कालपर्यंतच्या नुकसानीची माहिती सरकारमार्फत घेण्यात आली आहे. सतरा लाख हेक्टर जमिनीच्या पिकाचा नुकसानीची पंचनामे आले आहेत. याचा लवकरच जीआर काढला जाईल. तातडीची मदत शेतकऱ्यांना द्यायची आहे. ती जिल्हाधिकाऱ्यामार्फत दिली जाणार आहे. शेतीचे वेगळे आणि घर पडले असेल त्याचे पैसे वेगळे दिले जाणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. आपत्ती फार मोठी आहे. नुकसान मोठे झाले आहे. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचे सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com