Chandrashekhar Bawankule News : भाजपचे बावनकुळे म्हणतात, राज्यात डबल इंजिनचं सरकार येणार ? अजितदादांच्या 'NCP'चा विसर...

BJP Political News : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात डबल इंजिन सरकार येईल, असे विधान करून त्यांनी या निमित्ताने विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Mumbai News : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात डबल इंजिन सरकार येईल, असे विधान करून त्यांनी या निमित्ताने सत्ताधारी व विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे.

प्रसार माध्यमांशी बुधवारी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawnkule ) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार येईल, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बावनकुळे अजित पवार यांना विसरले का? अशी चर्चा जोरात रंगली आहे. बावनकुळे अजित पवार यांना विसरले का? अशी चर्चा सुरू आहे. (Chandrashekhar Bawankule News)

मुंबईत माध्यमांशी संवाद साधतांना त्यांना महायुतीतील घटक पक्ष नाराज असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आले होते. यासंदर्भात बोलताना महायुती पक्की असून राज्यात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

येत्या निवडणुकीत आमची महायुती मजबूत आहे. आमच्या ११ पक्षांची महायुती मजबूत आहे. आम्ही अत्यंत मजबुतीने विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule
Mahayuti Politics : भंडाऱ्यात महायुतीत बिघाडी, आमदार भोंडेकर म्हणाले, माजी मंत्री फुकेंमुळे अनेकांनी भाजप सोडला !

मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री घेतील

येत्या काळात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आहे. त्यांना योग्य वाटेल तेव्हा ते विस्तार करतील. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना काय वाटतंय, यापेक्षा मुख्यमंत्र्यांना जेव्हा वाटेल, तेव्हा ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राज्यात भाजपच मोठा भाऊ

राज्यात भाजप (Bjp) मोठ्या भावाच्या भूमिकेत असून लहान भावांना सांभाळण्याची आमची भूमिका आहे. मात्र, कोणाला किती जागा मिळणार, यााबाबतचा निर्णय महायुतीचे नेते एकत्रित बसून लवकरच घेतील. त्यासोबतच महायुतीच्या नेत्यांना जागावाटपाबाबत सार्वजनिकरित्या विधान करू नये, असे आवाहनही यावेळी बोलताना कोणाचेही नाव न घेता बावनकुळे यांनी केले.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : पराभवानंतर बावनकुळे उतरले मैदानात; विधानसभा जिंकण्याच्या दिल्या टिप्स

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com