Eknath Khadse News : आपल्याच 'इच्छे'ने अडचणीत आलेल्या भुजबळांच्या मदतीला धावला अखेर 'हा' जुना सवंगडी

Political News : राज्यसभेत जाण्याची इच्छा असणे यात काही गैर नाहीय मात्र यात पक्षाचा जो काही निर्णय तो अंतिम असतो, असे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
Eknath Khadse, Chhagan Bhujbal
Eknath Khadse, Chhagan BhujbalSarkarnama

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. चार दिवसापूर्वीच त्यांनी राज्यसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे भुजबळ खरेच नाराज आहेत का ? असा सवाल केला जात असतानाच राज्यसभेत जाण्याची इच्छा असणे यात काही गैर नाहीय मात्र यात पक्षाचा जो काही निर्णय तो अंतिम असतो, असे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) इच्छुक होते. त्यांनी मतदारसंघातून तयारी सुरु केली होती. महायुतीत उमेदवारी देण्यास उशीर झाल्याने भुजबळांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या.

छगन भुजबळ यांनी महायुतीला अडचण निर्माण होईल, अशी अनेकदा वक्तव्य केली. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून प्रसार माध्यमात ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देत रिंगणात उतरविण्यात आले.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीची बैठक पार पडली. मंत्री छगन भुजबळ हे नाशिकच्या जिल्ह्यात असूनदेखील या बैठकीला गैरहजर होते. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.

Eknath Khadse, Chhagan Bhujbal
Video Mahayuti News : थेट स्ट्राइक रेट सांगत शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा मोठा दावा; भाजप नव्हे तर महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ

रिक्त असलेल्या राज्यसभेच्या जागेवर निवडणूक लढण्याची इच्छा मंत्री छगन भुजबळ यांना व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. भुजबळ हे वरिष्ठ असून गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणात चांगले काम करत आहेत. त्यामुळे राज्यसभेत जाण्याची इच्छा असणे यात काही गैर नाही. मात्र, यात पक्षाचा जो काही निर्णय तो अंतिम असतो, असे सांगत एकनाथ खडसे (Ekanth Khadse) यांनी भुजबळांचे समर्थन केले आहे. त्यामुळे एकीकडे भुजबळांच्या नाराजीवर टीका केली जात असताना खडसेंनी त्यांची बाजू सांभाळून घेतली आहे.

एकनाथ खडसे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचे समर्थन केले असले तरी महायुतीमधील त्यांचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने मात्र भुजबळांच्या इच्छेवरून नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेना शिंदे गटाने सुनावले

भुजबळ यांच्या नाराजीबाबत आता शिवसेना शिंदे गटाने अजित पवार यांनाच सुनावले आहे. भुजबळ कोणकोणत्या गोष्टीवर नाराज असतात, याबाबत अजित पवार यांनी एकदाचा निर्णय घ्यावा, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Khadse, Chhagan Bhujbal
Pankaja Munde News : पंकजा मुंडे भाजपऐवजी अपक्ष लढल्या असत्या तर विजय मिळाला असता; 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com