Chhagan Bhujbal : पुतण्याने साथ सोडताच भुजबळांना झाली ठाकरे,पवार अन् मुंडेंची आठवण; म्हणाले, पुतण्यांचा डीएनएच...'

Chhagan bhujbal sameer Bhujbal Sharad Pawar gopinath munde : समीर भुजबळ यांनी काका छगन भुजबळ यांची साथ सोडत नांदगाव मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात समीर भुजबळ लढणार आहेत.
Chhagan bhujbal sameer Bhujbal
Chhagan bhujbal sameer Bhujbal sarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी आपल्या पदाचा राजीनाम देत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पुतण्याच्या या निर्णयावर बोलताना महाराष्ट्रातील काका पुतण्याच्या राजकारणाची आठवणच छगन भुजबळ यांना झाली.

'शरद पवारांचा पुतण्या, अजितदादांचा पुतण्या, पूर्वी गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे असे पुतणे आहेत ते काकाचं ऐकतातच असं नाही.राजकारणातील पुतण्यांचा डीएनएच वेगळा आहे. असं वाटतंय' ', असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

समीर भुजबळ यांनी काका छगन भुजबळ यांची साथ सोडत नांदगाव मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात समीर भुजबळ लढणार आहेत. त्यामुळे नांदगाव विधानसभेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Chhagan bhujbal sameer Bhujbal
Maharashtra Assembly Election : ...म्हणून कार्यकर्त्यांनो, तुम्ही आयुष्यभर सतरंज्याच उचला!

समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ते म्हणाले, अतिशय प्रतिकुल परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये संघटन मजबूत केले. मात्र, नांदगावमध्ये भुजबळ कुटुंबाचे ऋणानुबंध आहेत. येथील कार्यकर्ते, पदाधिकारी माझी भेट घेऊन अन्याय होत असल्याचे सांगितले त्यामुळे मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

सुहास कांदेंचा आरोप

सुहास कांदे हे नांदगावचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून समीर भुजबळ अपक्ष लढणार असल्याने आपण देखील येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या विरोधात लढू, असे सुहास कांदे म्हणाले. महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरणात आपण याचिका केली होती. या प्रकरणात छगन भुजबळ यांना क्लिन चिट देणे चुकीचे असल्याचे कांदे म्हणाले आहेत.

Chhagan bhujbal sameer Bhujbal
Shankarrao Gadakh : भाजपकडून पराभव, ठाकरेंच्या पठ्ठ्याला आता शिवसेनेकडून आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com