Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा सरकारला इशारा; माझी भूमिका पटत नसेल तर बाहेर काढा

Obc Reservation News : गरज पडली तर सरकारमधून बाहेर पडेन, पण मी माझी भूमिका बदलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मराठा आरक्षण प्रश्नावर मंत्री छगन भुजबळ चांगेलच आक्रमक झाले आहेत. माझी भूमिका सरकारला पटत नसेल तर पक्षाने मला बाहेर काढावे, अशी आक्रमक भूमिका छगन भुजबळ यांनी सामच्या मुलाखतीप्रसंगी घेतली आहे. गरज पडली तर सरकारमधून बाहेर पडेन, पण मी माझी भूमिका बदलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. येत्या काळात मी ओबीसींसाठी कायम लढत‌ राहणार आहे. ओबीसी जनता माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे येत्या काळात ओबीसींसाठी माझा लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी भुजबळ यांनी राज्य सरकारकडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला घुसविण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांचा ओबीसीमधून आरक्षणाचा हट्ट धरण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray : राऊतांची उमेदवारी निश्चित, ठाकरेंच्या दौऱ्यात प्रचाराचा शुभारंभ?

माझी भूमिका सरकारला जर पटत नसेल तर पक्षाने मला बाहेर काढावे. मला मंत्रीमंडळातून काढून टाकावे. त्यासोबतच आमदारकी काढून घ्यावी, अशी आक्रमक मागणी छगन भुजबळ यांनी यावेळी केली. त्यामुळे येत्या काळात सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.

येत्या काळात ओबीसींची राज्यभर यात्रा काढणार आहे. या आरक्षण बचाव रॅलीला १ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटपास स्थगिती द्यावी, सगेसोयऱ्याच्या मुद्द्यावर हरकती घेणार आहोत. मराठा आरक्षणाची अधिसूचना रद्द करा, ३ फेब्रुवारीला नगरमध्ये ओबीसी मेळावा घेण्यात येणार आहे. नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची मराठा आरक्षणाला विरोध ही भूमिका वैयक्तीक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भुजबळ पक्षात एकाकी पडलेत की काय असे वाटत आहे. तर दुसरीकडे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ही भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ओबीसींची भूमिका मांडावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता भुजबळ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal: मंत्री छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर; ओबीसी नेत्यांची बैठक घेत केली मोठी घोषणा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com