Mumbai News: ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक झाली. यावेळी राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. या विरोधात येत्या 1 फेब्रुवारीला सर्व आमदार, खासदार आणि तहसीलदारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची घोषणा यावेळी या बैठकीत करण्यात आली. (Chhagan Bhujbal Meet OBC Leaders)
यावेळी उपस्थित असलेल्या बहुतांश नेत्यांनी ओबीसी समाजावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे हा समाज मोठी चळवळ उभी करेल. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय अयोग्य आहे. मराठा आरक्षणाबाबत सरसकट मागच्या दाराने मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतले जात असल्याने असंतोष निर्माण होईल, असा इशारा देण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी भुजबळ यांनी, शपथपत्र देऊन जात बदलता येते का ? असा सवाल केला. येत्या तीन फेब्रुवारीला नगरमध्ये ओबीसींची भव्य सभा घेतली जाणार आहे. सरकारने अधिसूचनेचा जो मसुदा तयार करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय पाहता ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
आमच्या ओबीसी, भटक्या-विमुक्त लेकरांचा घास आज काढून घेतला जात आहे. त्याबद्दल आम्हाला दुःख आणि संताप आहे. बहुसंख्य असलेल्या ओबीसी घटकांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, असा निश्चय उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.
सरकारने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाच्या विरुध्द चर्चा करण्यासाठी मुंबई येथील सिद्धगड या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. शनिवारी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरुध्द राज्यातील सर्व ओबीसी समाजाचे आणि संघटनेच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी मंत्री भुजबळ यांनी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde), आमदर गोपीचंद पडळकर, नारायण मुंडे, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, आगरी समाजाचे राजाराम पाटील, मुस्लिम ओबीसी नेते शब्बिर अन्सारी, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, तुकाराम बिडकर, मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, दौलतराव शितोळे, सत्संग मुंडे, कल्याण दळे, दशरथ पाटील, ऍड.सुभाष राऊत, प्रा.दिवाकर गमे, शंकरराव लिंगे, ईश्वर बाळबुद्धे, बाळासाहेब कर्डक यांच्यासह विविध संघटना आणि समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.