Nitin Gadkari : …तर पुतळा 100 टक्के कोसळला नसता! गडकरींनी सत्ताधाऱ्यांनाच फटकारलं

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Rajkot Fort Malvan : राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद अजूनही राज्यभर उमटत आहेत. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले जात आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परखड मत व्यक्त केले आहे.

दिल्लीत मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठे विधान केले आहे. पुतळा उभारताना स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कोसळला नसता असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी पुतळा उभारणीत निष्काळजीपणा झाल्याचे सूचक विधान करत सत्ताधाऱ्यांच्या कामावरच बोट ठेवले आहे.

Nitin Gadkari
Sharad Pawar VIDEO : 'शिवरायांनी सूरत लुटली नव्हती,' फडणवीसांच्या विधानावरून शरद पवारांनी खडसावलं...

काय म्हटले आहेत नितीन गडकरी?

गडकरी म्हणाले, समुद्रकिनारी 30 किलोमीटर अंतरात बांधकामामध्ये स्टेनलेस स्टीलच्या वापराशिवाय पर्याय नाही. जर शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेनलेस स्टील वापरले असते तर शंभर टक्के कोसळला नसता. मुंबईत पाहा, कितीही चांगले काम करा, पण समुद्राच्या बाजुला असलेल्या बिल्डींगमध्ये लगेच गंज चढतो. त्यासाठी कोणते मटेलिअल वापरायचे, कॉस्ट इफेक्टिव्ह कोणते आहे, प्री कास्टचा उपयोग अधिक प्रमाणात करणे का गरजेचे आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

गडकरींच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मत व्यक्त केले. ते म्हणाले, केंद्र सरकारमध्ये गडकरी एक मंत्री आहेत. एखादे काम हाती घेतले तर ते बारकाईने करतात. कामाचा दर्जा चांगला राहील, याची काळजी ते घेतात. देशात अनेक रस्ते सुधारत आहेत. त्यामध्ये गडकरींचे योगदान आहे. हे मी संसदेतही सांगतो. त्यात राजकारण आणण्याचा संबंध नाही. पुतळ्याबाबत त्यांनी मत व्यक्त केले असेल तर जाणकारांचा सल्ला घेऊनच व्यक्त केले असेल.

Nitin Gadkari
Ajit Pawar : अजितदादा राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत; उपमुख्यमंत्र्यांचा उदगीर दौरा रद्द

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, गडकरी म्हणतात ते खरे आहे. समुद्राच्या काठावर पुतळा होता. लोखंड गंजते हे नव्याने सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पुतळा उभारताना स्टेनलेस स्टीलचा वापर व्हायला होता. पण या लोकांनी थातूरमातूर काम करून लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मते घेण्याचा केलेला हा धंदा होता, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com