

Devendra Fadnavis on Manoj Jarange: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी आता निर्णयक लढ्याची घोषणा केली असून त्यासाठी ते मुंबईला उपोषणासाठी रवाना होणार आहेत. पण पोलिसांनी त्यांना मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच जरांगेंबाबत आणि त्यांच्या उपोषणाबाबत सविस्तर आणि थेटच भूमिका मांडली आहे.
मुख्यमंत्री मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, "मनोज जरांगेंच्या जवळजवळ सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत...सगळ्या! आणि काही मागण्या अशा आहेत की ज्या कोर्टात आहेत, विविध टप्प्यांवर आहेत. ते ही आम्ही अवगत केलेलं आहे की, या मागण्या पूर्ण करण्याकरता कोर्ट आहे किंवा इतर संविधानिक पद्धती आहेत, त्याचा अवलंब केल्याशिवाय मागण्या मान्य होऊ शकत नाही. आमची पहिल्यापासून भूमिका राहिली आहे. आम्ही चर्चेची द्वारं कधीच बंद केली नाहीत. आम्ही केवळ एवढंच सांगितलं की, जे राज्यघटनेप्रमाणं आहेत ते आम्ही करायला तयार आहोत. ज्या गोष्टी कायदा, कोर्टानं आखून दिलेले नियम याच्याबाहेर जातील, ते आम्हाला करता येणार नाहीत. त्यामुळं अतिशय खुल्या मनानं सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत"
दरम्यान, आज जरागेंनी आंतरवाली सराटीतून पत्रकार परिषदेला संबोधित करताना समाजबांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अत्यंतिक भावनिक आवाहन केलं. आज माझा उपोषणाचा १७ वा दिवस असून आता सलाईनही न लावल्यानं पोटात आग पडली आहे. मी मुंबईला उपोषणासाठी एकटाच जाणार असून माझ्यासोबत केवळ चार-पाच सहकारीच असतील. मला आता उठूनही उभं राहता येत नसल्यानं रस्त्यात कोणीही सत्काराचं आयोजन करु नये, मला बोलता आल तरच मी भाषण करेन. माझी तुमच्याशी कदाचित ही केवळ शेवटची भेट असेल, त्यामुळं मला आशीर्वाद द्यायला या पण मुंबईला येऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "मला फक्त तुमच्या लेकराबाळांसाठी कोणालाही शरण जायचं नाही, झुकायचं नाही. हे मराठ्यांनी लक्षात घ्या. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या तोडीस तोड ड़ाव टाकायचा आहे. त्यांनी देवी-देवतांच्या आडून डाव टाकला होता. मराठ्यांचं खच्चीकरण आणि बदनामी करायची, लोक घुसवून दंगल करायची आणि मग गोळीबार करुन आंदोलन चिरडून टाकायचं, हा त्यांचा डाव आहे. मराठ्यांना नेत्यांची कमी नाही, एक नेता नाही तर दुसरा नेता आहे. जो आरक्षण देईल, त्याला निवडून आणायचं. राजकारणी आणि श्रीमंत मराठे जास्तीत जास्त 25 ते 50 लाख असतील. पण बाकीचे साडेपाच कोटी गरीब मराठे आहेत, ते कधीही मुंबई जाम करु शकतात, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.