Suvendu Adhikari: प. बंगालमध्ये कार्ल मार्क्स, लेनिनची ओळख पुसणार! CM सुभेंदू अधिकारींनी घेतला मोठा निर्णय

Suvendu Adhikari Marx Lenin latest news: पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर आता पक्षानं आपला अजेंडा राबवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार, आरएसएसचा आणि भाजपचा पारंपारिक शत्रू राहिलेल्या डाव्यांची ओळख पुसण्याचं काम इथं सुरु करण्यात आलं आहे.
Suvendu Adhikari
Suvendu Adhikari sarkarnama
Published on
Updated on

Suvendu Adhikari News : पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर आता पक्षानं आपला अजेंडा राबवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार, आरएसएसचा आणि भाजपचा पारंपारिक शत्रू राहिलेल्या डाव्यांची ओळख पुसण्याचं काम इथं सुरु करण्यात आलं आहे. त्यानुसार, कार्ल मार्क्स, लेनिन यांची ओळख आता पुसली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील रस्ते, पूल आणि सार्वजनिक जागांची नावं बदलण्याचं काम आता अधिकारी सरकार हाती घेणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी कार्तिक महाराज म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वामी प्रदीप्तानंद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. कोलकाता महानगर पालिकेच्या (केएमसी) एका अधिकाऱ्यानं सोमवारी सांगितलं की, या समितीची पहिली बैठक दुर्गा पुजेनंतर होऊ शकते. या बैठकीत कोलकात्यातील रस्त्यांची नावं बदलण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या समितीच्या शिफारशींनुसारच नावांबाबतचा बदल केला जाणार आहे.

Suvendu Adhikari
Amit Shah: "...तरीही अमित शहा पंतप्रधान बनू शकणार नाहीत"; महाराष्ट्रातील खासदाराचा खळबळजनक दावा

समितीत कोणाकोणाचा समावेश?

समितीच्या सदस्यांमध्ये मेघालयाचे माजी राज्यपाल तथागत रॉय, मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारींचे सल्लागार सुब्रत गुप्ता आणि कोलकाता महापालिकेचे आयुक्त स्मिता पांडे यांचा समावेश आहे. कार्तिक महाराजांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, 'हो ची मिन्ह रोड', 'लेनिन रोड' आणि 'कार्ल मार्क्स रोड'ची नावं बदलली जातील. इतर रस्त्यांची नाव बदलण्याचा प्रस्तावही प्राप्त झाला आहे. पण या समितीनं शिफारस केली तरच या रस्त्यांची नाव बदलण्यात येतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

केएमसीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "भाजपच्या पश्चिम बंगाल विभागाचे अध्यक्ष राहिलेले तथागत रॉय यांनी 'लेनिन रोड'चं नाव बदलून गणितज्ज्ञ आणि जनसंघाचे माजी अध्यक्ष देबप्रसाद घोष यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तर खिदिरपूरमध्ये 'कार्ल मार्क्स रोड'चं नाव बंगाली कवी मायकल मधुसूदन दत्त किंवा रंगालाल बंदोपाध्याय यांचं नाव देण्याची शिफारस केली आहे. कारण ते या भागाशी संबंधित होते. तसंच 'हो ची मिन्ह' रोडसाठी रॉय यांनी मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे.

Suvendu Adhikari
Amit Shah: "...तरीही अमित शहा पंतप्रधान बनू शकणार नाहीत"; महाराष्ट्रातील खासदाराचा खळबळजनक दावा

लेनिन यांचा पुतळा हटवण्याची मागणी

केएमसी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "तथागत रॉय यांनी जवाहरलाल नेहरु रोड आणि सिद्धो-कान्हू डहरच्या चौकात उभारलेला लेनिनचा पुतळा हटवण्याची मागणी देखील केली आहे. तसंच एखाद्या महत्वाच्या रस्त्याला सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव देण्यात यावं. लेनिन रोडला यापूर्वी धर्मतला स्ट्रीटच्या नावानं ओळखलं जातं होतं. पण नंतर १९७० मध्ये लेनिनचा जन्मशताब्दी सोहळ्यावेळी याचं नाव बदलण्यात आलं. त्यानंतर पुढच्यावर्षी सर्क्युलर गार्डन रीच रोडचं नाव बदलून 'कार्ल मार्क्स रोड' करण्यात आलं होतं.

रॉय यांनी पुढे अशीही सूचना केली की, मुस्लिम महनीय व्यक्तींच्या नावांच्या ठिकाणांची नावं बदलून राष्ट्रवादी मुस्लिमांची नावं तिथं दिली गेली पाहिजेत. यासाठी त्यांनी कोलकाताजवळच्या बारासातमध्ये 'टीटुमीर' नामक बस स्थानकासाठी लेखक काजी अब्दुल वद्दू, विक्षाविद बेगम रुकैया आणि लेखक एस. वाजेद अली यांच्या नावाचा पर्याय दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com