Devendra Fadnavis News : धस-मुंडे भेटीने काही फरक पडत नाही, बीड हत्या प्रकरणात मी खंबीर भूमिका घेतली आहे!

Chief Minister Devendra Fadnavis expresses support for the Dhas-Munde meeting : सुरेश धस मॅनेज झाले, हे प्रकरण आता दाबले जाणार, अशी टीका चोहोबाजूंनी सुरू झाली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस हे आधुनिक काळातील फितूर असल्याची टीका केली.
CM Devendra Fadnavis News
CM Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली. धस यांच्यावर ते मॅनेज झाले, ते फितूर झाले अशी टीका होऊ लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीत गैर काय? एखाद्या आजारी व्यक्तीला भेटायला जाऊ नये का? असे म्हणत धस यांचा बचाव केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धस यांनी घेतलेल्या भेटीने काही फरक पडत नसल्याचे सांगत ही विरोधकांची पोटदुखी असल्याचे म्हटले आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींच्या अटकेसाठी भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी रान उठवले होते. वाल्मीक करासह सर्व आरोपींच्या कुंडल्या, त्यांच्याविरोधातील पुरावे बाहेर काढत फास आवळण्यात महत्वाची भूमिका बजावली. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही या निमित्ताने धस यांनी टीका केली होती. मात्र अचानक त्यांनी धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याने एकच खळबळ उडाली.

सुरेश धस मॅनेज झाले, हे प्रकरण आता दाबले जाणार, अशी टीका चोहोबाजूंनी सुरू झाली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस हे आधुनिक काळातील फितूर असल्याची टीका केली. त्यांनी मराठा समाजाचा आणि देशमुख कुटुंबियांचा विश्वास घात केल्याचा आरोपही त्यांनी केला. धस-मुंडे भेटीची धग कायम असतानाच आज जळगाव दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

CM Devendra Fadnavis News
Suresh Dhas News : सुरेश धसांनी विश्वास गमावला, लपून-छपून घेतलेल्या मुंडेंच्या भेटीने पितळ उघडे!

बीड प्रकरणात आपण गंभीर भूमिका घेतली आहे. त्यामुळे धस-मुंडे यांची भेट झाली असली तरी काही फरक पडत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कोण कुणाला भेटले याच्यावर राजकारण होत असेल तर ते लोकशाहीमध्ये योग्य नाही, लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे. बीडमधील हत्याप्रकरणात मी खंबीर भूमिका घेतलेली आहे. खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवाद तोडून टाकायचा असे करण्याची आवश्यकता नाही.

CM Devendra Fadnavis News
Dhananjay Munde Vs Dhas : कोंबडं कितीही झाकलं तरी...! सुरेश धस अन् बावनकुळेंच्या दाव्यानं मुंडेंचं कार्यालय काही मिनिटांतच तोंडावर पडलं

धनंजय मुंडे हे राज्याचे मंत्री आहेत, एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्याने कुठलाही फरक पडत नाही. सुरेश धस यांनी देखील सांगितला आहे की, भेट घेतली तरी हेतू एकच आहे की सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तोच हेतू घेऊन सुरेश धस काम करत आहेत. मात्र, काही लोकांच्या पोटात दुखते, त्यामुळे ते यावर टीका करतात, अशा शब्दात फडणवीस यांनी या भेटीचे समर्थन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com