Dhananjay Munde Vs Dhas : कोंबडं कितीही झाकलं तरी...! सुरेश धस अन् बावनकुळेंच्या दाव्यानं मुंडेंचं कार्यालय काही मिनिटांतच तोंडावर पडलं

Dhananjay Munde Politics : भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीचं वृत्त दाखवण्यात आल्यानंतर काहीच वेळात मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं हे वृत्त फेटाळून लावलं होतं.
Dhananjay Munde And Suresh Dhas .jpg
Dhananjay Munde And Suresh Dhas .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवरचा दबाव वाढत असतानाच शुक्रवारी (ता.14) दुपारी बीडसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी येऊन धडकली. संतोष देशमुख हत्याप्रकरणात ज्यांनी धनंजय मुंडेंवर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप केले. त्यांच्याविरोधात रान पेटवलं. आता त्याच धस आणि मुंडे यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली. पण काही क्षणातच धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) कार्यालयानं अशी कोणतीही भेट झाली नसल्याचा खुलासा केला. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश धस यांच्या वेगवेगळ्या दाव्यानं मुंडेंच्या कार्यालयाचा दावा काहीच वेळात खोटं उघडं पाडलं.

भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीचं वृत्त दाखवण्यात आल्यानंतर काहीच वेळात मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं हे वृत्त फेटाळून लावलं होतं.यावेळी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये कोणतीही भेट झालेली नाही, असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं. पण त्यानंतर काही क्षणातच भाजप प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्या निवासस्थानी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यासोबत साडेचार तासांची बैठक झाली होती,अशी कबुली दिली.

या भेटीवर बावनकुळे म्हणाले,आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो.सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघेही होते.दोघांमध्ये मतभेद आहेत,मनभेद नाहीत.दोघेही इमोशनल आहेत.दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो,काळ मतभेद दूर करतो.लवकरच मुंडे आणि धस यांच्यातील मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष असून माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे.त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे.आम्ही तिघेही परिवार म्हणून बसल्याची माहिती बावनकुळेंनी यावेळी दिली.

Dhananjay Munde And Suresh Dhas .jpg
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावलेंचं आता तुळजाभवानी मातेला साकडं!

तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी (ता.14) माध्यमांशी संवाद साधला. धसांनी यावेळी धनंजय मुंडेंसोबत माझ्या दोन भेट झाल्याचे मान्य केले. एक भेट 15 ते 20 दिवसांपूर्वी झाली. बावनकुळेंच्या निवासस्थानी मला जेवायला भेटायला बोलावलं होतं. त्यावेळी तिथं धनंजय मुंडे येणार असल्याची कल्पना नव्हती. पण ते मी दाखल झाल्यावर काहीवेळानं तेही तिथं आले. त्यावेळी बावनकुळेंनी तुमच्यात मतभेद आहे.ते काही मिटेल का असं विचारलं.पण मी नाही म्हटलं. त्यानंतर मुंडे आणि मी तिथून निघून गेलो, असंही धस यांनी सांगितलं.

तसेच धनंजय मुंडेंचं ऑपरेशन झाल्यावर मी त्यांना भेटलो.मी केवळ त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो.रात्री त्यांना त्रास झाल्यामुळे दत्तात्रय भरणेमामांनी त्यांना दवाखान्यात दाखल केलं होतं.काल मी माणुसकीच्या नात्यानं धनंजय मुंडेंना भेटलो.या भेटीवेळी त्यांनी माझा या हत्याप्रकरणात काहीही संबंध नसल्याचं मुंडेंनी सांगितलं. पण मी त्यांना तुमचा या प्रकरणात हात आहे की नाही, किंवा संबंध आहे की नाही हे तपासात समोर येईनच असं सांगितलं.मी धनंजय मुंडेंना भेटलो असलो तरी माझा लढा सुरूच राहणार असल्याचंही धस यांनी ठणकावून सांगितलं.

Dhananjay Munde And Suresh Dhas .jpg
Modi Government News : मोदी सरकारची शिवजयंतीनिमित्त मोठी घोषणा; राज्य सरकारला धाडलं पत्र

सुरेश धस अडकला पाहिजे असं प्लॅनिंग सुरु असल्याचं सध्या दिसून येत आहे.तुम्ही भेटून आल्याची बातमी लीक करत असाल तर मग अवघड आहे.शंका उपस्थित होईल अशा बातम्या पेरल्या जात आहेत. पण मी संतोष देशमुख सोबतच राहणार आहे. मनोज जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर त्यांची भेट घेऊन तो दूर करेन असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसेच देशमुखांच्या पत्नीलाही नोकरीची ऑर्डर काढून प्रलोभन दाखवण्यात येत असल्याचा आरोपही धस यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com