Eknath Shinde On Uddhav Thackeray : अडीच वर्षे त्यांनी 'लाडला बेटा योजना' राबवली; शिंदे यांची ठाकरेंवर सणसणीत टीका

Maharashtra Assembly Budget 2024-2025 : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प 2024 वर विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खोचक उत्तर चर्चेत आहे.
Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde On Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Budget 2024 : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा सादर केलेल्या अर्थसंकल्प 2024 वर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधकांनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये समाचार घेतला.

'अडीच वर्षे त्यांनी लाडला बेटा योजना राबवली. तसेच, औरंगजेब आणि याकूब मेमन यांना फादर मानले आहे, त्यांना चादरीशिवाय काय दिसणार', असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प सादर करताना विविध योजनांची घोषणा केल्या. या घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होणार? राज्य सरकार कर्जबाजारी आहे. या घोषणांची अंमलबजावणीसाठी पैसा कोठून आणणार? असे प्रश्न करत राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या, विशेष करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Khadse : मनाने भाजपमध्ये असणाऱ्या नाथाभाऊंचा सरकारवर भरोसा नाय का?

''लाडली बहीण ही योजना', जशी राबवत आहोत, तशी 'लाडला भाऊ' ही योजना राबवावी', अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली होती. योजना राबवताना भेदभाव नको, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'सुशिक्षित बेरोजगारांना महिन्यांला दहा हजार रुपये देत आहोत. हीच लाडला भाऊ योजना आहे की, त्यांनी अर्डीच वर्षे लाडला बेटा ही योजना राबवली, त्याचे काय?', असे म्हणत टीकास्त्र सोडले. जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत, 'औरंगजेब आणि याकूब मेमन यांना फादर मानले आहे. त्यांना चादरीशिवाय काय दिसणार', असा टोला लगावला.

Eknath Shinde On Uddhav Thackeray
Jayant Patil On Maharashtra Budget : जयंत पाटील यांनी एका वाक्यात बजेटची केली चिरफाड; म्हणाले, 'चादर लगी फटने...'

वर्षाला तीन सिलिंडर मोफत दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमुळे विरोधक गॅसवर आले आहेत. युवक बेरोजगार झाला आहेत, अशी टीका केली जाते. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'आम्ही सत्तेत येताच सरकारने नोकऱ्यांवरील निर्बंध हटवले. मुख्यमंत्री रोजगार योजनांचा फायदा युवकांना झाला आहे. सुशिक्षित बेरोजगारांना दहा हजार रुपये महिना देते आहोत. हा ऐतिहासिक निर्णय आहे'. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना या अर्थसंकल्पातून घोषित केल्या आहेत. शेतीपंपावरील वीजबिल माफ केले आहे. हा अजितदादांचा अर्थसंकल्प आहे. दादा हे वाद्याला पक्का आहेत. सरकार दिलेला शब्द पाळणारे आहेत. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांवर पैशांची तरतूद करून त्या प्रत्यक्षात राबवण्यावर आमचा भर राहणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

"दोन वर्षात शेतकऱ्यांना काय दिले, असे म्हणत असती, तर आम्ही 15 हजार कोटी रुपये दिले. शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांमधून 45 हजार कोटी रुपये दिले. हिशोब पाहिजे असल्यास ते देऊ शकतो. खोटं बोलं, पण रेटून बोलं, अशी विरोधकांकडून दिशाभूल केली जात आहे. खत आणि बियाणांवर जीएसटी असल्याचे सांगितले जात आहे. पण तसे काही नाही. खोटं नॅरेटिव्ह सेट आता होणार नाही. आमचा अर्थसंकल्प पाहून त्यांचे चेहरे पांढरे पडले होते. चेहरे उतरले होते. विधानसभेत दोन वर्षे आम्ही जे काम केले आहे, त्याचे पावती लोकं आम्हाला देतील", असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com