Eknath Khadse : मनाने भाजपमध्ये असणाऱ्या नाथाभाऊंचा सरकारवर भरोसा नाय का?

Eknath khadse Reaction Budget Ajit Pawar : एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना केंद्रात राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे लवकर एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होईल असे सांगितले जात आहे.
Eknath Khadse P
Eknath Khadse Sarkarnama

Eknath Khadse News : भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पावर अविश्वास दाखवला आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले, एकंदरीत पाहता अर्थसंकल्पाचे स्वरूप हे चांगले आहे. पण त्याची अंमलबजावणी होईल की नाही हे सांगता येत नाही.

अंमलबजावणी होईल की नाही, असे म्हणत एकनाथ खडसे लगेच निघून गेले. त्यामुळे मनाने भाजपमध्ये असणाऱ्या नाथाभाऊंचा सरकारवर भरोसा नाही का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

एकनाथ खडसे Eknath Khadse यांची सून रक्षा खडसे यांना केंद्रात राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे लवकर एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होईल असे सांगितले जात आहे. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसेंनी या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होईल की नाही, असे म्हटल्याने त्यांचा सरकारवर विश्वास नाही का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

Eknath Khadse P
Maharashtra Budget 2024 : जयंत पाटीलसाहेब, आपल्यावेळेस पुढं जायचंच नाही ते! अजितदादांनी डिवचलं...  

ठाकरेंच्या पोटात दुखते?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav thackeray यांनी लाडकी बहिण प्रमाणे लाडका भाऊ ही योजना सुरू करावी, अशी मागणी केली होती. ठाकरेंच्या या मागणीवर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, अत्यंत चांगले बजेट सरकारने मांडले आहे. मात्र त्यांच्या नेतृत्वात सरकार असताना त्यांनी कुठल्याही योजना आणल्या नाही. ज्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा ते काही करू शकले नाही. त्यांच्या पोटात दुखत आहे, असा टोला लगावला.

इलेक्शन बजेट

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजनांचा पाऊस पाडल्याची टीका विरोधक करत आहेत. लाडकी बहिण योजना प्रभावीपणे मध्य प्रदेश राज्यात राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्याचे सांगितले जाते. तशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे घोषणा अजित पवारांनी केली. या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत.

Eknath Khadse P
Raj Thackrey : भाजपची डोकेदुखी वाढणार; जळगावमध्ये सहा जागांवर मनसेचे उमेदवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com