Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत काय गडबड झाली, तेच सांगून टाकली...

Chief Minister Eknath Shinde's big statement for farmers : भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार शेतकऱ्यांसाठी सर्व काही करत आहेत. केंद्रीय कृषिमंत्री यांची वेळ घेणार आहोत. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडून, त्यांच्याकडून आश्वासक असे न्याय शेतकऱ्यांसाठी मिळवून, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama

Eknath Shinde On Mumbai : शिवसेना नेता तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेत कशी गडबड झाली यावर भाष्य केले आहे. देशाला आणि राज्याला विकासाची गती हवी असेल तर, एक विचाराधारेच सरकार येणे गरजेचे आहे. परंतु लोकसभेत गडबड झाली.

विरोधकांनी भाजपच्या 400 पारच्या नाऱ्याचा संदर्भ संविधान बदलाशी जोडला आणि लोकांनी तोच डोक्यात ठेवला आणि जी व्हायची ती गडबड झाली, असे शिंदे यांनी म्हटले. या निवडणुकीत कांद्यामुळे देखील थोडा त्रास झाला, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

राज्यात कांद्याने आमची अडचणी केली. काही भागात विरोधकांनी आमच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट केला. त्यामुळे आम्हाला नुकसान झाले. विरोधकांनी संविधान बदलणार, असे सांगून भाजपच्या 400 पार नाऱ्याकडे लक्ष वेधले. यातून भाजप (BJP) आणि मित्रपक्षाच्या सरकार नॅरेटिव्ह अधिक पक्का झाला. लोकांनी 400 पारचा नारा नॅरेटिव्ह म्हणून एवढा डोक्यात ठेवला आणि तिथेच आमच्याबाबत गडबड झाली.

पण शेतकऱ्यांना दुःखी करून कोणी सुखी होणार नाही. आमचे सरकार शेतकरी विचारांचे आहे. हे सरकार शेतकऱ्यांसाठी सर्व काही करत आहेत. केंद्रीय कृषिमंत्री यांची वेळ घेणार आहोत. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडून, त्यांच्याकडून आश्वासक असे न्याय शेतकऱ्यांसाठी मिळवून, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाची बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून नेहमीच प्राधान्य असते, असे त्यांनी सांगितले. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांना काय अडचणी असतात, हे मला चांगले माहित आहे. शेतीविषय विषय हाताळण्यासाठी माझा पुढाकार नेहमीच असतो. मी गावी जातो आणि शेतीसुद्धा करतो. काही लोक म्हणतात की, मुख्यमंत्री हेलिकाॅप्टरने जाऊन शेती करतात. पण वेळेची बचत व्हावी मी हेलिकाॅप्टरचा वापर करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

CM Eknath Shinde
Milk Price Hike Farmers Agitation : एकनाथ शिंदे सरकारचं सर्वच काढलं; मंत्री विखेंच्या कारभारावर शेतकरी नाराज अन् आता...

शेतीत वेगवेगळे प्रयोगच शेतकऱ्यांना फायद्याचे ठरू शकतात. बांबूच्या शेतीसाठी सरकारने अनुदान देण्याचे ठरवले आहे. तापमान की करायचे असेल, तर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे. 2022 मध्ये बांबू लावला होता. यावेळी बांबू लावले नसते तर आज बैठकीला हजर नसतो. सर्व प्रकल्प ठप्प झालेले होते. राज्यात बांबू लागवडीला सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. आचारसंहितेमुळे अनेक कामे अडकली. मराठवाडा, विदर्भात प्रावधान केलेल्या सोयाबीन आणि कापूस बियाणांचे वाटप करण्यात आले नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

CM Eknath Shinde
PM Narendra Modi : शपथ घेऊन 24 तास उलटत नाही तोच मोदींचा शेतकऱ्यांनंतर आता सर्वसामान्यांसाठीही 'हा' धडाकेबाज निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com