Shinde Vs Thackeray: ''वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना...''; ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार

Maharashra Politics: ''सूड, बदला घेण्याची खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही...''
Shinde and Thackeray
Shinde and Thackeray Sarkarnama

Mumbai : शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सभेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय? असा सवाल उपस्थित करतानाच मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काही शक्य होतं ते मी केलं. पण ज्या पद्धतीने पाठीत वार करून आपलं सरकार पाडलं त्याचा सूड घेणारच असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला होता. आता ठाकरेंच्या याच टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें(Eknath Shinde)नी उध्दव ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. शिंदे म्हणाले, सूड, बदला घेण्याची खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. तसेच 2019 ला जोडे पुसायला कोण गेलं होतं? जोडे पुसायला गेले होते की जोडे धुवायला गेले होते? हे लोकांना माहिती आहे. हा सर्वसामान्यांबद्दल द्वेष, मस्तर आहे. चहावाला, टपरीवाला, रिक्षावाला, भाजीवाला हे सर्वसामान्य माणसं नेतृत्व करायला लागतात तेव्हा लागतात तेव्हा अशाप्रकारची पोटदुखी होते अशी टीका शिंदेंनी केली.

Shinde and Thackeray
Narendra Modi : 'वॉरंटी' संपलेला पक्ष 'गॅरंटी' काय देणार?; पंतप्रधानांचा मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

एकनाथ शिंदे काय म्हणाले, काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात.

त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…

यावेळी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर बोचरी टीका केली. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील हे नक्की असा घणाघात शिंदेंनी यावेळी केला.

Shinde and Thackeray
Jayant Patil News : राष्ट्रवादीत भाकरी फिरणार; जयंत पाटलांच्या जागी 'या' तीन नावांची चर्चा!

त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते....

जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com