Jayant Patil News : राष्ट्रवादीत भाकरी फिरणार; जयंत पाटलांच्या जागी 'या' तीन नावांची चर्चा!

Sharad Pawar News : राष्ट्रवादीत भाकरी फिरणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
Sharad Pawar, Jayant Patil News
Sharad Pawar, Jayant Patil NewsSarkarnama

NCP State President News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरण्याची वेळ आली आहे असे सांगितले. या पार्श्वभूमीवर येत्या काळात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तब्बल पाच वर्षे प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्षाच्या इतर सेलचे अध्यक्षसुद्धा अनेक वर्षापासून त्या-त्या पदावर काम करीत आहेत. जयंत पाटील यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमायचा झाला तर राष्ट्रवादीत अनेक इच्छुक आहेत.

आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे आणि धनंजय मुंडे ही तीन प्रमुख नावे सध्या चर्चेत आहेत. शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा पाच वर्षांपूर्वी जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले त्यावेळीसुद्धा होती. मात्र, काही कारणाने त्यावेळी हे नाव मागे पडले. यावेळी पुन्हा शशिकांत शिंदे यांच्या नावाचा विचार होणार की धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांच्या नावावर विचार होणार यावर कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतरे आहेत.

Sharad Pawar, Jayant Patil News
Rohit Pawar News : पवारांनी भाकरी फिरवणार असल्याचे सांगितले; रोहित पवारांची महत्वाच्या पदासाठी शिफारस...

राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोनाच्या काळात आरोग्य मंत्री म्हणून केलेले काम महाराष्ट्रभर पोचले. या निमित्ताने त्यांची सकारात्मक प्रतिमा महाराष्ट्राच्या कोणा कोपऱ्यात पोचली आहे. धनंजय मुंडे हे देखील तरुण नेतृत्व म्हणून राष्ट्रवादीच्या संघटनेत महत्त्वाचे नाव आहे. विधानपरिषद तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रचार सभांमध्ये एक धडाडणारी तोफ असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. मात्र, धनंजय मुंडे आणि एक शशिकांत शिंदे यांच्यापेक्षा राजेश टोपे यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी अधिक योग्य असल्याचे संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

पक्षाचे अध्यक्ष पवार यांनी बुधवारी मुंबईत केलेल्या वक्तव्याचा विचार केला तर केवळ पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद नव्हे तर युवक, युवती, विद्यार्थी आणि ओबीसी या प्रमुख प्रमुख सेलच्या अध्यक्षपदांबाबत देखील भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे. या प्रत्येक सेलवर काम करणारे अध्यक्ष हे गेल्या अनेक वर्षापासून त्या पदावर काम करीत आहेत. त्यामुळे आता पक्षातील अनेक नव्यांना संधी मिळेल अशी आशा आहे.

Sharad Pawar, Jayant Patil News
Beed APMC Election : बीडमध्ये काका-पुतण्यात तर परळीत बहिण-भावात संघर्ष..

येत्या काळात राज्यात महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. येत्या वर्षभरात या निवडणुका निश्चितपणे होतील. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरवण्याचे केलेले वक्तव्य नेमकं टायमिंग साधणारे आहे. पवार यांनी सुचित केल्याप्रमाणे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत खालपासून वरपर्यंत प्रचंड बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com