Warkari Welfare Scheme: पंढरपूरमध्ये पोहोचण्यापूर्वीच वारकऱ्यांना सर्वात मोठी भेट : फडणवीस सरकारने थेट शासन आदेशच काढला

CM Warkari Mahamandal, Warkari Welfare Scheme, Pandharpur HQ Approved: राज्यातील वारकरी आणि कीर्तनकारांना वारीत मूलभूत सोयीसुविधा, विमा व वैद्यकीय मदत देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळ' स्थापन केले असून त्याचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे.
The Maharashtra government issues a government resolution to set up the Chief Minister Warkari Mahamandal headquartered in Pandharpur to ensure welfare and infrastructure for Warkaris.
The Maharashtra government issues a government resolution to set up the Chief Minister Warkari Mahamandal headquartered in Pandharpur to ensure welfare and infrastructure for Warkaris.Sarkarnama
Published on
Updated on

CM Warkari Mahamandal: राज्यातील वारकरी आणि किर्तनकरांना वारी काळात मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी व विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी राज्य सरकार मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करणार आहे. या संदर्भात सामाजिक न्याय विभागाने शासन आदेश पारित केला आहे. प्रशासकीय रचनेनुसार सामाजिक न्याय मंत्र्यांकडे महामंडळाचे अध्यक्षपद राहणार आहे. तर महामंडळाचे मुख्यालय हे पंढरपुरमध्येच केले जाणार आहे.

या नव्या मुख्यमंत्री वारकरी महामंडळामुळे वारकर्यांचे प्रश्न आणि समस्या सुटण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे वारकरी व किर्तनकारांनी स्वागत केले आहे.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकर्यांसाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी यासाठी वारकरी महामंडळ स्थापना करण्याची घोषणा केली होती.

The Maharashtra government issues a government resolution to set up the Chief Minister Warkari Mahamandal headquartered in Pandharpur to ensure welfare and infrastructure for Warkaris.
Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

त्यानुसार सामाजिक न्याय विभागाच्या उप सचिव वर्षा देशमुख यांनी बुधवारी (ता.8) मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापनेचा शासन आदेश पारित केला आहे. महामंडळाच्या माध्यमातून दैनंदिन प्रशासकीय कामकाज करणे, सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करणे, किर्तनकार व वारकर्यांना अन्न, निवारा, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

अशी आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची रचना

मुख्यमंत्री वारकरी महामंडळामध्ये सामाजिक न्याय मंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय महामंडळामध्ये सामाजिक न्याय विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, सोलापूरचे जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक, विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, आळंदी व देहू संस्थानचे कार्यकारी अधिकारी, विधिमंडळ किंवा प्रशासकीय सेवेतील महिला, शासन नियुक्त महिला वारकरी, उपविभागीय अधिकारी पंढरपूर, अशा १९ सदस्यांची निवड केली जाणार आहे.

The Maharashtra government issues a government resolution to set up the Chief Minister Warkari Mahamandal headquartered in Pandharpur to ensure welfare and infrastructure for Warkaris.
Mahayuti Politics: शिवसेनेच्या 4 बड्या नेत्यांनी पेटवला पुन्हा मुख्यमंत्री पदाचा मुद्दा, एका मंत्र्याचाही समावेश; महायुतीत वादाचा नवा अंक ?

शासनाच्या या निर्णयाविषयी बोलताना वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील म्हणाले की, राज्य सरकारने वारकर्यांसाठी चांगला निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या माध्यमातून वारी काळात चांगले नियोजन करता येईल, तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा निर्माण करण्यास मदत होणार आहे. हे महामंडळ पूर्णपणे शासन नियुक्त असल्यामुळे वारकर्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ऐन आषाढीच्या तोंडावर सरकारने वारकर्यांना हे गिप्ट दिले आहे. वारकरी म्हणून या निर्णयाचे स्वागत करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com