Chitra Wagh News : सभागृहात आमदार चित्रा वाघ आणि आमदार अनिल परब यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यावरू आज (शुक्रवारी) विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्या दालनात बैठक घेत दोन्ही नेत्यांना समज दिल्याची माहिती आहे. मात्र, हा वाद अजुनही मिटण्याचे नाव घेत नाही. चित्रा वाघ यांनी आज माध्यमांसमोर बोलताना पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार अनिल परब यांना टार्गेट करत जळजळीत प्रश्न विचारले.
सुषमा अंधार यांचे नाव न घेता चित्रा वाघ म्हणाल्या, 'ज्याची जशी लायकी तशी तो वक्तव्य करतो. माझ्यावर टीका केली. माझ्या कॅरेक्टवर प्रश्न केला. अजून किती वर्ष प्रश्न विचारणार. माझ्या कॅरेक्टरला धरून बोललं जातं. तुमची लायकी काय? त्यांच्या त्या अनिल परबने माझ्याकडे बोट करून प्रश्न विचारला तर त्याला उत्तर देऊ नको? हा प्रश्न एकट्या चित्रा वाघचा नाहीये. आम्हाला हलक्यात घेऊ नका हा मेसेज होता त्यांना तर सरफटर लोक सोडता आमच्यावर.'
महिला स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत असते. त्या ठिकाणी अनिल परबांसारखी नीच प्रवृत्ती तिला ठोकत असते. तिला बोलत असते. आपण उत्तर कधी द्यायचं. मी उत्तर दिलं तर माझ्यावर तुटून पडले. मला फरक नाही पडत.
तुमची नीच प्रवृत्त कधी थांबणार?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. 'मुद्दे संपले आमच्या घरावर बोलावं, माझा 26 वर्षांचा संघर्ष. त्या वशिल्याने आल्या आहेत. मला फडणवीसांनी संधी दिली. मी २६ वर्ष संघर्ष केला. हम किसीको छेडते नहीं पर अगर किसीने छेडा तो छोडते भी नही.', असे चित्रा वाघ यांनी ठणकावले.
'सगळं बायकांनी संभाळायचं आणि त्यांनी बायकांवर बेछूट आरोप करायचं. कोण काय बोलतंय याने मला फरक पडत नाही. परत नादी लागाल तर ठेचून काढेल. माझ्यात फरक पडणार नाही. जो काम करतो जो सहन करतोय तोच बोलायची ताकद ठेवतो. कोण काय बोलं हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. त्यांच्या डोक्यात घाण आहे. यांची घाणेरडी वृत्ती आहे.', असे देखील चित्रा वाघ म्हणाल्या.
सुषमा अंधारेंनी चित्रा वाघांवर आरोप केला होता की पक्षात घेण्यासाठी त्या ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या. त्यावर वाघ यांनी मी नाही तर उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांकडून निरोप पाठवला की तुमच्या सारख्या महिलांची पक्षाला गरज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.