"BJP फ्लॉवर नहीं फायर है" : चित्रा वाघ यांना 'पुष्पा'ची आठवण

Chitra Wagh | BJP | : १२ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा तापणार?
Chitra Wagh
Chitra Wagh Sarkarnama

नागपूर : मागील वर्षी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या (BJP) १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. सर्वोच न्यायालयाने (Supreme Court) आज त्या १२ आमदारांचे निलंबन रद्द ठरवून उद्धव ठाकरे सरकारला (Thackeray Government) चांगली चपराक लावली आहे. यावर आता भाजप नेत्यांच्या विजयी प्रतिक्रिया देण्यास आणि 'मविआ' सरकारवर टीका करण्यास सुरुवात झाली असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रविण दरेकर (Pravin Darekar), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मात्र चित्रा वाघ यांना ही टीका करताना आणि प्रतिक्रिया देताना सुप्रसिद्ध पुष्पा चित्रपटाची आठवण झाली. त्या म्हणाल्या, महा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलं आहे. कायदा- नियम पायदळी तुडवून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले पण सर्वोच्च न्यायलयाने ते निलंबन रद्द केले. महाबिघाडी सरकार किती असंवैधानिक आणि खुनशी वागतं आहे हे आता स्पष्ट झालं आहे. हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है..! अशी चित्रा वाघ यांनी 'पुष्पा'स्टाईल टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले, सत्यमेव जयते!

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. टि्वट करीत त्यांनी आभार मानले आहे. आपल्या टि्वटमध्ये त्यांनी 'सत्यमेव जयते,' असं म्हटलं आहे. आपल्या टि्वटमध्ये फडणवीस म्हणतात, ''राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार! या निकालाचे आम्ही स्वागत करतो.''

Chitra Wagh
फडणवीसांनी प्रचारसभेतच केली पहिल्या मंत्र्यांच्या नावाची घोषणा

विधानसभा अध्यक्षच निर्णय घेणार!

दरम्यान, बारा आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्ष व विधीमंडळ सचिवालय योग्य तो निर्णय घेईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, बारा आमदारांचे हे निलंबन हे त्यांच्या दुष्कृत्याबद्दल व चुकीच्या वागणूकीबद्दल करण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राप्त होईल त्यावेळी विधानसभा अध्यक्ष आणि सचिवालय त्याचा अभ्यास करेल व त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल. निलंबनाचा निर्णय सरकारनी नव्हे तर विधिमंडळातील घटनेबाबत विधानसभा अध्यक्षांचा निर्णय होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com