Mumbai News : 'मला मंत्रिपद मिळत असताना एकानं राजीनामा देण्याची धमकी दिली होती. त्यामुळं माझं मंत्रिपद हुकलं आणि त्याच आमदारला सिडकोचं अध्यक्षपद दिलं', असा गौप्यस्फोट शिवसेना एकनाथ शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी केला.
सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार संजय शिरसाट यांच्याकडे गोगावलेंकडे रोख होता. यावर संजय शिरसाट यांनी यावर सावरासावरी करणारी प्रतिक्रिया देताना, 'भरत गोगावले यांना सिरियस घेऊ नका', असं म्हटलं आहे.
संजय शिरसाट म्हणाले, "मुख्यमंत्री (Shiv Sena) आणि आपल्यामधील संवादाची बाहेर वाच्यता करायची नसते. भरत माझा मित्र आहेत. त्यांना सकाळी फोन केला. काय बोलला तू, अशी विचारणा केली. त्यावर त्या अनुषंगाने बोललो, असं सांगितलं. मी भरतचा स्वभाव ओळखतो. गर्दीत आला की, तो काय बोलेल याचा नेम नसतो. त्यामुळे त्यांना सिरियस घेऊ नका".
'भरत गोगावले यांनी वेगळं बोललं आहे. ते समजण्यात वेगळचं आलं. मी त्यावेळी, असं म्हणालो होतो की, पहिला शपथविधी झाल्यानंतर मी राजीनामा देईल. मला शिंदेसाहेबांनी (Eknath Shinde) समजावल्यानंतर मी तो निर्णय मागे घेतला', एवढाच विषय आहे, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं.
भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांच्यातील मंत्रीपदाच्या विधानावर संजय राऊत यांनी शेलक्या शब्दात टीका केली. ते म्हणाले, "हे डबक्यातील बेडूक आहे. हे सगळे डराव डराव करत आहेत. मातेसमान शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेंबाच्या पाठीत खंजीर खुपसला". बेडूक आणि गांडुळाचा आयुष्य फक्त पावसाळ्यापुरतं असतं. नंतर संपत. तसंच शिंदे गटाचे विधानसभा निवडणुकीनंतर संपणार आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी, भाजप कपटी, कारस्थानी आहे, अशी टीका केली. यावर संजय शिरसाट म्हणाले, "हे तुम्हाला 25 वर्षानंतर कळालं, तुम्हाला सत्ता पाहिजे होती, तेव्हा ते चांगले होते. शिवसेनाप्रमुखांची हिंदुत्वाची भूमिका होती ती कुठे गेली आता? स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनाप्रमुखांचे विचार विकणारी औलाद आम्हाला कपटी म्हणते. यांना काँग्रेस आणि शरद पवार देखील विचारत नाहीत, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली.
''घर का ना, घाट का', अशी यांची अवस्था झाली आहे. अशा अवस्थेत फक्त भुंकण्याचे काम करत आहेत. विधानसभा टायमिंगला प्रत्येक पक्षात प्रवेश सुरू असताना, यांच्याकडे कुत्र सुद्धा जात नाही. काँग्रेस आणि शरद पवार यांच्याकडे पक्षप्रवेश वाढलेत, तसंच आमच्याकडे देखील पक्षप्रवेश वाढलेत', असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.