
Maharashtra Government : महाराष्ट्रातील अतिवृष्टीनंतर नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 17 तुकड्या कार्यरत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. आतापर्यंत 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2 हजार 215 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, अद्याप पंचनाम्याचे काम थांबवलेले नाही. नवनव्या ठिकाणी पाऊस पडत आहे. तिथे पंचनामे करून मदत केली जाईल. एखाद्या जिल्ह्यात आता कमी मदत दिसत असेल तरी उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळेल. शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी हा उद्देश आहे. घर, जमीन याबाबत नुकसानीची भरपाई देण्याचे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत. पैशांची कुठली कमतरता पडणार नाही याची काळजी घेत आहोत.
कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती आहे याचा आढावा आम्ही घेतला आहे. पालकमंत्र्यांसह मंत्र्यांना पूरग्रस्त भागात भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी स्वत: काही भागात जाणार आहे. पण मदतकार्यावर ताण येणार नाही असा आमचा प्रयत्न असेल. परिस्थिती समजून घेऊन अधिक मदत करता येईल, उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला अधिकचा दिलासा कसा देता येईल याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही यावेळी फडणवीस यांनी दिले.
ओला दुष्काळ जाहीर करणार का?
ओला दुष्काळ सोडा, या ठिकाणी जे काही नुकसान झाले त्या करीता नियमात जी आहे ती मदत देऊ असे म्हणत दुष्काळ जाहीर करण्याच्या विषयाला फडणवीस यांनी बगल दिली. शिवाय एनडीआरएफच्या अंतर्गत आगाऊ रक्कम आपल्याला दिलेली असते. त्यानंतर आपल्याला काही मदत केंद्राकडून मिळते. पण तोपर्यंत राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, असेही आश्वास त्यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.