Devendra Fadnavis Announcement : महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं गिफ्ट, आता मंत्रालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही...

CM District-Level Medical Assistance Cell : गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये 'मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष' सुरू करण्यात येणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हे कक्ष पालकमंत्री, मंत्री किंवा राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णावर उपाचार करू न शकणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांना जिल्हास्तरावरच मदत मिळणार आहे.

या कक्षामार्फत रुग्ण व नातेवाईकांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची सद्यस्थिती, मदतीसाठी पात्र असलेल्या आजारांची माहिती तसेच संलग्न रुग्णालयांची यादी मिळणार आहे. त्यामुळे अर्जदारांना वेळ व पैसे वाचतील आणि मदत तत्काळ पोहोचेल. याशिवाय कक्षातर्फे जनजागृती, रुग्णालयातील भेटी, गरजूंना मदत, आपत्तीच्या ठिकाणी उपस्थिती आणि निधीसाठी देणग्या वाढवण्याचे प्रयत्नही करण्यात येणार आहेत.

Devendra Fadnavis
Bharat Gogawale-Aditi Tatkare: गोगावलेंना कुणी गंडवले? तटकरे-अमित शाह भेट सार्थकी लागली का?

या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना दिलासा मिळणार असून आरोग्य सहाय्यासाठी अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

मंत्रालयात जाण्याची आवश्यकता नाही

गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा तसेच अर्ज आणि पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण किंवा नातेवाईकांना मंत्रालयात जावे लागू नये, या दृष्टीने या कक्षाची रचना करण्यात आली आहे.त्यामुळे मदतीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबईला मंत्रालयात जाण्याची वेळ येणार नाही. त्यांना जिल्हास्तरावरच मदत मिळेल.

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना राज्याच्या प्रगतीत जनतेच्या आणि कामगार वर्गाच्या योगदानाचे विशेष कौतुक केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या संदेशात त्यांनी राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली व महाराष्ट्राने उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक न्याय यांसारख्या विविध क्षेत्रांत साधलेल्या नेत्रदीपक प्रगतीचे स्मरण केले. तसेच प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया असा संदेश दिला.

Devendra Fadnavis
Bharat Gogawale-Aditi Tatkare: गोगावलेंना कुणी गंडवले? तटकरे-अमित शाह भेट सार्थकी लागली का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com