Eknath Shinde News : आक्षेपार्ह विधानानंतर रामगिरी महाराज अन् सीएम शिंदे एकाच मंचावर; म्हणाले, 'महाराष्ट्राच्या भूमीत...'

Political News : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पंचाळे गावामध्ये सुरू असणाऱ्या हरिनाम सप्ताहाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन भेट दिली.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : सिन्नर येथील पंचाळे गावामध्ये हरिनाम सप्ताहाच्या दर्शनासाठी दर दिवशी लाखो भाविक येतात. आम्हाला सभा घ्यायची असेल तर काय काय करावे लागते. पण याठिकाणी नागरिक स्वतःहून येतात. वारकरी संप्रदायाची ताकद गावागावात आहे. त्यांना दिशा देण्याचे काम रामगिरी महाराज करतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यामुळे या भूमीत संतांचा सन्मान केला जाईल. संतांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पंचाळे गावामध्ये सुरू असणाऱ्या हरिनाम सप्ताहाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahjan) भेट दिली. यावेळी मंचावर खासदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार सुजय विखे पाटील, शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे देखील यावेळी उपस्थित होते. (Eknath Shinde News)

याठिकाणी देवाचा वास आहे, म्हणून लोक याठिकाणी बसतात. इथे कडक ऊन आहे तरी तुम्ही येथे बसले आहात. ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता येथे नागरिक याठिकाणी हजर राहतात. देवाच्या नाम स्मरणात लोक तल्लीन होतात. धर्मवीर आनंद दिघे हा सप्ताह कधीच चुकवत नव्हते, असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

यावर्षी आषाढीला गेल्या वर्षापेक्षा जास्त दुप्पट लोकं होती. गेल्यावर्षी वारीला 15 लाख वारकरी होते. यावर्षी 25 लाख वारकरी होते. वारकरी संप्रदायाची ही ताकद, महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात समाज प्रबोधनासाठी वापरली जाते. खरं म्हणजे अनेक कटुंब दु: खातून सावरलेली आपण पाहतो. त्यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Eknath Shinde
Video Uddhav Thackeray : शरद पवारांच्या समोर मुख्यमंत्रि‍पदाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले...

त्यामुळेच एवढ्या उन्हात तुम्ही बसलेले आहात. वारकरी संप्रदाय ही समाजाची मोठी ताकद आहे. हा संप्रदाय समाज प्रबोधनाचे काम करीत आहे. त्यामुळेच या परिसरातील वातावरण भक्तिमय झाल्याचे दिसत आहे. या अखंड हरिनाम सप्तहाला व संतांच्या कीर्तनाला नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेनी रामगिरी महाराजांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वक्तव्य केले होते. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. शुक्रवारी ते एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Eknath Shinde
Video Supriya Sule : 'लोकसभेच्या निकालानंतर लाडकी बहीण आठवली', सुप्रिया सुळे यांचा टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com