Eknath Shinde : 'लाडकी बहीण' निवडणुकीसाठी नाही, मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली योजनेमागची खरी कहाणी

CM Eknath Shinde mazi ladki bahin yojana : आम्ही कुटुंब संभाळणाऱ्या महिलांसाठी योजना आणल्या सोबत मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाची सोय केली. शेतकऱ्यांची मोफत वीजबीलाची योजना आणली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News :आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना गेमचेंजर ठरू शकते, असा प्रचार महायुतीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. महायुतीचे नेते मेळावे घेत योजना महिलांपर्यंत पोहोचवत आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सरकारने ही योजना आणल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन योजनांची घोषणा करण्याची पद्धत ही काँग्रेसची आहे. मात्र, निवडणुका झाल्या की प्रिंटींग मिस्टेक म्हणून हात झटकाचे. आमचे तसे नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली नाही.

आठ महिन्यापूर्वीच आम्ही या योजनेवर काम सुरू केले होते.तेव्हा तर निवडणुका नव्हत्या. आठ महिन्यांपासून ही योजनेसाठी आम्ही काम करत होतो, असे म्हणत लोकसभा निवडणुकीच्या आधीच लाडकी बहीण योजनेची तयारी सुरु केल्याचे संकेत मुख्यमंत्री शिंदेंनी दिले.

Eknath Shinde
Eknath Shinde : "उद्धव ठाकरेंनी त्यावेळी मला सांगितलं असतं तर..."; मुख्यमंत्रि‍पदाबाबत CM शिंदेंचं मोठं विधान

आम्ही लाडकी बहीण योजना आणल्यावर विरोधक विचारत होते बहीणींसाठीच योजना आणली का ? आम्ही कुटुंब संभाळणाऱ्या महिलांसाठी योजना आणल्या सोबत मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाची सोय केली. शेतकऱ्यांची मोफत वीजबीलाची योजना आणली. युवांसाठी योजना आणली. हे आम्ही निवडणुकीसाठी केली नाही. आठ महिन्यांपासून याची तयारी करत होतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महायुतीचा विजय निश्चित

लोकांनी अधीचा अडीज वर्षांचा कारभार पाहिला आहे. लोकांनी आमचा दोन वर्षांचा कारभार पाहिला आहे. आम्ही लोकांसाठी योजना आणल्या आहेत. महाराष्ट्राची जनता सुज्ञान आहे. ते पुन्हा महायुतीलाच विजयी करतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

...तर श्रीकांतला मंत्री केले असते

मी घराणेशाही मानत नाही. केंद्रात आम्हाला एक मंत्री पद मिळाले होते. सगळे म्हणत होते की मंत्रिपद श्रीकांतला द्या. मात्र, तो पक्षासाठी काम करतोय. मला वाटले असते तर मी मंत्रिपद श्रीकांतला दिले असते. मात्र आम्ही घराणेशाही मानत नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्याला आम्ही मंत्रिपद दिले, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Manoj Jarange Vs Sambhaji Bhide : हे फडणवीसांचं नवं अस्त्र! मनोज जरांगेंचा संभाजी भिडेंवर पलटवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com