Manoj Jarange Vs Sambhaji Bhide : हे फडणवीसांचं नवं अस्त्र! मनोज जरांगेंचा संभाजी भिडेंवर पलटवार

Maratha Reservation Devendra Fadnavis : संभाजी भिडे यांनी मराठ्यांनी आरक्षण मागावं का, असे विधान केले आहे. त्याला मनोज जरांगेंनीही उत्तर दिले आहे.
Sambhaji Bhide, Manoj Jarange
Sambhaji Bhide, Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचे मराठा आरक्षणाबाबतचे वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यावरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत भिडेंना प्रत्त्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले संभाजी भिडे?

मराठा आरक्षणावर बोलताना भिडे म्हणाले, मराठ्यांनी आरक्षण मागावं का, अरे, मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठून काढलं. सिंहांनी संबंध जंगल सांभाळायचंय. उभ्या पृथ्वीवर असलेल्या सगळ्या सागरात विना अडथळा फिरण्याचे स्वातंत्र असलेले मासे आहेत. त्यांनी स्वीमिंग क्लबमध्ये जायचे नाही.

गरुडांनी ग्लायडिंग क्लबमध्ये जायचे नाही. कमांडोंनी ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालवणारी जात, हे मराठ्यांच्या ज्यादिवशी मराठ्यांच्या लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल, असे वक्तव्य भिडे यांनी केले आहे.

Sambhaji Bhide, Manoj Jarange
Ramgiri Maharaj : रामगिरी महाराज विधानावर ठाम; म्हणाले, 'आदर्श चांगले नसतील, तर समाज रसातळाला...'

जरांगेंचे प्रत्युत्तर

भिडेंना प्रत्युत्तर देताना जरांगेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. हे शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. याला-त्याला दोष देऊन उपयोग नाही. जंगल आमचं आहे ना, मग वाघ आरक्षणाची शिकार करणार. कशाला लागतंय आरक्षण, हे ज्या-ज्या संघटनेत पक्षात मराठ्यांची पोरं आहेत, त्यांना माहिती आहे. कारण त्या पक्षाचा किंवा संघटनेचा झेंडा उचलून तो आपल्या लेकरांचं बहीण-भावाचं कल्याण करू शकत नाही. त्यांना आरक्षण लागणार आहे, असे भूमिका जरांगे यांनी मांडली.

देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपपासून मराठा लांब चालला आहे. आता ह्यांच्यापासूनही जाईल. आम्हीही छत्रपतींच्या विचारांचे हिंदू आहोत. आम्ही आमचं आरक्षण मिळवू. देवेंद्र फडणवीस एक-एक अस्त्र काढत आहेत, आता हे नवीन अस्त्र काढलंय, अशी टीका जरागे यांनी केली.

Sambhaji Bhide, Manoj Jarange
Sambhaji Bhide : मराठ्यांनी देश चालवायचा, आरक्षण का मागावं? संभाजी भिडेंचा सवाल

भिडेंचा होता आरक्षणाला पाठिंबा

संभाजी भिडे यांनी मागील वर्षी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असताना तिथे जाऊ भेट घेतली होती. यावेळी त्यांनी जसं पाहिजे तसं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे आजच्या त्यांच्या विधानामुळे आपल्या भूमिकेपासून त्यांनी फारकत घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com