Ladki Bahin Yojana Scam : सरकारचा मोठा धक्का : ‘लाडक्या’ अपात्रांकडून 11 कोटी वसूल, छाननीचा फास घट्ट

The Women and Child Development Department has initiated recovery proceedings against ineligible beneficiaries under the CM Majhi Ladki Bahin Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून महिला व बाल विकास विभागाने वसुली सुरू केली आहे.
Ladki Bahin Yojana Scam 1
Ladki Bahin Yojana Scam 1Sarkarnama
Published on
Updated on

CM Ladki Bahin Scheme Maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून वसुली सुरू करण्यात आली आहे.

आतापर्यंत 11 कोटी रुपयांची अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, पुरूष आणि सरकारी सेवेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू असून, त्यांच्याकडून देखील वसुली होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (CM Majhi Ladki Bahin Scheme) गैरप्रकार झाल्याचे समोर येत आहे. पुरूषांबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेसाठी पात्र नसलेल्या लाभार्थ्यांनी देखील लाभ घेतल्याने अनेक तक्रारी होत्या. राज्य सरकारकडे याच्या तक्रारी झाल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे.

राज्य सरकारने चौकशी सुरू करताच काही लाभार्थ्यांनी लाभाची रक्कम परत केली. काहींनी स्वतःहून योजनेतून नाव काढून घेतले. मात्र काहींनी लाभाचे पैसे परत केले नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांचा (Worker) देखील यात समावेश आहे. अशा कर्मचाऱ्यांविरोधात वेतन रोखणे, बढती थांबवणे, वार्षिक मूल्यांकनावर शेरे मारणे, अशा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यातून काहींच्या पगारातून रक्कम वसुली देखील सुरू करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana Scam 1
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं भवितव्य काय? अनेक शंका-कुशंका; फडणवीसांच्या बजेटमधील विधानामुळे चर्चा रंगली

या योजनेत सुरवातीला तक्रार होताच, सुमारे 2,400 सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे समोर आले होते. माहिती अधिकारात सुमारे 12,915 सरकारी कर्मचाऱ्यांनी दरमहा 1,500 रुपयांचा लाभ घेतल्याची बाब उघड आली. यावरून बराच गदारोळ झाला. महिला व बाल विकास विभागाने या प्रकरणात कारवाईला वेग घेतला. पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कारवाईचे निर्देश दिले. ग्रामीण विकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना वसुली आणि शिस्तभंगाची कारवाई आदेश दिले आहेत.

Ladki Bahin Yojana Scam 1
AAP Crisis Punjab : 'आप'मध्ये भूकंप! राघव चड्ढांच्या संपर्कात 63 आमदार; पंजाबमध्ये सत्तेसाठी केजरीवाल-सिसोदिया धावपळीत

या योजनेत किमान 164.52 कोटी रुपये चुकीच्या पद्धतीने वितरित झाल्याचे उघड झाले होते. यात 12,431 पुरुष आणि 77,9८0 अपात्र महिलांचा समावेश होता. या योजनेतील लाभार्थ्यांची अधिक पद्धतीने कडक छाननी करण्यात आली. यानंतर सुमारे 57 लाख लाभार्थ्यांवर शंका उपस्थित झाली आणि त्यांना योजनेतून अपात्र करण्यात आले. या कारवाईपूर्वी जवळपास 26 लाख लाभार्थी संभाव्य अपात्र असल्याचे आढळले होते. यामुळे 26.34 लाख खात्यांवरील पैसे पडताळणी पूर्ण होईपर्यंत थांबवण्यात आले.

योजनेतील गैरप्रकार हिमनगाचे टोक

या योजनेतील गैरप्रकारावर हिमनगाचे टोक असल्याचे म्हटले होते. जून 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. सध्या या योजनेचे 1.57 कोटी लाभार्थी असून राज्याने यासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पुरूष लाभार्थ्यांकडून वसुली होणार

या योजनेत पुरूष लाभार्थी देखील आहे. काहींच्या बँक खात्यावर तसे पैसे जमा झाले आहेत. या लाभार्थी पुरूषांकडून वसुलीबाबत कारवाईची चाचपणी केली जात आहे. अजून नोटिसा काढल्या नसल्या तरी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी वसुली प्रक्रिया सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com