

AAP internal crisis : आम आदमी पक्षातील सात खासदार भाजपमध्ये सामील झाल्यानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपमध्ये सामील झालेले खासदार राघव चड्ढा आपला अजून जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे.
पंजाबमधील आपचे 63 आमदार हे, खासदार राघव चड्ढा यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सोसिदिया सावध झाले आहेत.
'आप'समोर (AAP) सध्या सर्वात मोठे आव्हान पंजाबमध्ये आहे. इथं पक्ष फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंजाब निवडणुकीत राघव चड्ढा आणि संदीप पाठक हे प्रचंड सक्रिय होते. या दोघांचा पंजाबमधील सत्ता आणण्यात मोठा वाटा होता.
पंजाबमध्ये 117 आमदारांपैकी सत्तेत असलेल्या आपचे 94 आमदार आहेत. त्यातील 63 आमदार हे राघव चड्ढा यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि मनीष सिसोदिया हे सावध झाले असून, पंजाबमधील आमदार आणि खासदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या सात खासदारांपैकी सहा पंजाबमधील आहेत. पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याची तयारी केली आहे. पक्षाच्या आमदारांसह ते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री भगवंत मान हे राष्ट्रपतींसमोर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सदस्यांना परत बोलावण्याबाबत (रिकॉल) पक्षाची भूमिका मांडणार असल्याची माहिती आहे. या खासदारांनी पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप मान यांनी केला आहे.
या खासदारांकडे कोणताही जनाधार नाही. एका सरपंचाकडेही स्वतःचा जनाधार असतो, या खासदारांकडे आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंजाबमध्ये पाय रोवता न आल्याने भाजपकडून धमक्या, प्रलोभने आणि पक्षांतर घडवून आणण्याच्या माध्यमातून सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका मुख्यमंत्री मान यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.