उद्धव ठाकरे हॉस्पिटलमधूनही काम करतायत, केअर टेकर मुख्यमंत्र्यांची गरज नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच.एन रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 Sanjay Raut, CM Uddhav Thackeray .jpg
Sanjay Raut, CM Uddhav Thackeray .jpgSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर सध्या पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यावर एच.एन रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळी त्यांची एक शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र अशावेळी दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री आजारपणात असल्याने कारभार पाहण्यासाठी केअर टेकर सीएमची चर्चा सोशल मिडीयात सुरु आहे. काल (गुरुवार) सोशल मिडीयामधून एकनाथ शिंदे यांना केअर टेकर सीएम नेमले असल्याची चर्चा सुरु होती. मात्र या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनीच याबाबात खुलासा केला होता.

याच चर्चांवर आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही केअर टेकर मुख्यमंत्र्यांची गरज नसल्याचे म्हंटले आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, केअर टेकर मुख्यमंत्री नेमण्याची काही गरज नाही. काही बातम्या पसरल्या होत्या पण त्यात काही तथ्य नाही. मानेची वेदना हे काही केअरटेकर मुख्यमंत्री नेमण्याचे निमित्त असू शकत नाही. तसेच मुख्यमंत्री कालपासून हॉस्पिटलमधून पण काम करत होते, दोन ते तीन दिवसात ते ठणठणीत बरे होवून पुन्हा राज्याच्या सेवेत परततील असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

 Sanjay Raut, CM Uddhav Thackeray .jpg
लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राज्यात राबवणार म्हणजे नेमके काय करणार?

कंगनाबेनचे पुरस्कार परत घ्या.

अभिनेत्री कंगना राणावतच्या (Kangna Ranaut) १९४७ ला स्वातंत्र्य भीक मागुन मिळाले होते. खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळाले या वादग्रस्त वक्तव्यावरही राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा अधिकार या सरकारला नाही, जो पर्यंत कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार मागे घेतले जात नाहीत. आणि ही संपूर्ण देशाची मागणी आहे. तसेच सलमान खुर्शीद हे सुद्धा पुरुषी वेषातले कंगनाबेनच असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com