RBI New Rules: आमदार-खासदारांचा सहकारी बँकेत हस्तक्षेप टळणार; नव्या नियमामुळे लोकप्रतिनिधींची अडचण

RBI Guidelines Co-Operative banks:पूर्वलक्षी प्रभावाने हा निकाल लागण्याची शक्यता असल्याने आमदार- खासदारांचा सहकारी बँकेतील थेट हस्तक्षेप टळणार आहे. शिवाय गेले अनेक वर्ष तळ ठोकून बसणाऱ्या आमदार खासदारांना देखील याचा फटका बसणार आहे.
RBI Guidelines Co-Operative banks
RBI Guidelines Co-Operative banksSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: सहकारी बँकेत दहा वर्ष संचालक पदावर राहण्याची कालमर्यादा रिझर्व बँकेकडून निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्याला आव्हान देणारी याचिका बॅक्स असोसिएशन कोल्हापूर सर्किट बेंचेकडे दाखल केली होती. रिझर्व बँकेच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

मात्र सर्किट बेंचने ही याचिका फेटाळली आहे. त्याचा अंतिम निकाल 15 जानेवारीला लागणार आहे. पूर्वलक्षी प्रभावाने हा निकाल लागण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील आमदार खासदारांचा सहकारी बँकेतील थेट हस्तक्षेप टळणार आहे. शिवाय गेले अनेक वर्ष तळ ठोकून बसणाऱ्या आमदार खासदारांना देखील याचा फटका बसणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सह राज्यातील अनेक बँकावर ज्या त्या जिल्ह्यातील आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींची सत्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बँकेचा कारभार सांभाळत राजकारणात देखील सक्रिय राहण्याची भूमिका बँकेतील संचालक मंडळांनी घेतली आहे. मात्र रिझर्व बँकेच्या नव्या निर्णयानुसार सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्ष बँकेचे संचालक पदावर राहता येणार असल्याने खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा बँक, आजरा अर्बन, कोल्हापूर अर्बन, गडहिंग्लज अर्बन, कल्लापन्ना आवाडे सहकारी बँक, यासारख्या अनेक छोट्या-मोठ्या सहकारी बँका आहेत. त्यामध्ये बहुतांश खासदार आणि आमदारांची सत्ता आहे. मात्र नव्या नियमामुळे लोकप्रतिनिधींचे अडचण झाली आहे.

RBI Guidelines Co-Operative banks
Haseen Mastan Mirza: डॉन हाजी मस्तानच्या कन्येची मोदी-शहांना साद; Video व्हायरल; हसीन मस्तान मिर्जाला रडू कोसळलं

त्याला आव्हान देणारी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचकडे दाखल केले असताना न्यायालयाकडून त्याला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. येता 15 जानेवारीला त्यावर अंतिम निकाल होणार आहे. मात्र निकाल गृहीत धरूनच अनेकांनी नूतन निवडणुकीत संचालक झालेल्यांची बदली केली आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. दहा वर्षांपासून ते अध्यक्ष आहेत. शिवाय जिल्ह्यातील आमदार, खासदार, नातेवाईक जिल्हा बँकेत संचालक आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत यांचे अडचण निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत या बँकांचा ताबा ठेवण्यासाठी पत्नी मुलगा वडील किंवा नातेवाईकावरच जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

वीरशैव आणि आजरा बँकेला दणका

नुकतीच आजरा बँकेची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. मात्र या निवडीमध्ये पाच संचालक हे दहा वर्ष अगोदर पासून संचालक आहेत. न्यायालयाचा निकाल लक्षात घेता आजरा अर्बन बँकेने पाच संचालकमध्ये बदल केला आहे. वीरशैव बँकेची देखील 15 डिसेंबर पर्यंत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे. मात्र वर्ष कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या संचालकांना अर्ज करण्यासाठी थांबवण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com