Maharashtra Politics : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि वाल्मीक कराडसह इतर आरोपींना अभय देणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजपाचे आमदार सुरेश धस प्रचंड आक्रमक झाले. परंतु धनंजय मुंडे यांची घेतलेली गुप्त भेट उघड झाली आणि सुरेश धस हिरोवरून व्हिलन ठरू लागले. संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या धस यांनी स्पष्टीकरण देऊन आपण भूमिकेपासून तसूभरही मागे हटणार नाही, असे सांगितले पण त्यांच्यावरचा विश्वास काहीसा ढळलाच.
राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आणि दोनच दिवसात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. धनंजय मुंडेचे मंत्री पद घालवण्यात सुरेश धस यांचा मोठा वाटा होता.संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेग आलेला असतानाच आता धस यांनी धनंजय मुंडे यांच्याभोवतीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. कृषी खात्यात दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर आता या प्रकरणात थेट ईडीकडे तक्रार करणार असल्याचे धस यांनी म्हटले आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्याच्या प्रकरणात धस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच धस यांनी आणखी आक्रमक होत धनंजय मुंडे विरोधातील मोहिम गतिमान केली आहे. मंत्रिपद गेल्यानंतर धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाणार हे यावरून दिसून येते. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या काळात 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणाची तक्रार सुरेश धस थेट ईडीकडे करणार आहेत.
काय हे घोटाळा?
तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची दोनशे कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता. नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे. 'डीएपी'त 56 कोटी 76 लाख रुपये, बॅटरी 45 कोटी 53 लाख, कापूस साठवणूक बॅगमध्ये 577 ची बॅग 1250 रुपये घेण्यात आली. तर 180 कोटी 83 लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या चमूने बाहेर काढले.
लोकायुक्त कार्यालयाला खोटी माहिती देण्यात आली. त्यामुळे, धनंजय मुंडे यांच्या काळातील या भ्रष्टाचाराची विशेष कृती दल (एसआयटी) स्थापन करून चौकशी करा. शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदीचा निर्णय घेण्यात आला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी 'जीआर'निघाला. हे सर्व 'डीबीटी'ने द्यावे, असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सुचवले होते.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावा, असे आदेश काढल्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता. या घोटाळ्याबाबत ईडीला पत्र लिहून धस आता तक्रार करणार आहेत. एकूणच गुप्त भेटीमुळे झालेल्या आरोपानंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.