Suresh Dhas : पाच वर्ष त्यांनी माझं वाटोळं केलं; धनंजय मुंडेंनंतर आता धसांच्या हिट लिस्टवर 'हा' बडा नेता

Suresh Dhas Reveals His Anger Towards Chhagan Bhujbal : सुरेश धस म्हणाले, भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मी निधीसाठी प्रयत्न करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मी त्यांना निधी मागायला गेलो तर ते म्हणायचे 'सही'.
Suresh Dhas
Suresh Dhas sarkarnama
Published on
Updated on

Suresh Dhas Vs Chhagan Bhujbal : संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण लावून धरत आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना अडचणीत आणले. सुरेश धस 2009 ते 2014 या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. ते आत्ता भाजपचे आमदार आहेत. धस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांच्यावर कायम राग राहिली, असे वक्तव्य करताना त्या मागचे कारण देखील सांगिले आहे.

'छगन भुजबळ माझ्याबद्दल बोलणारच. मीही त्यांचं नाव स्पष्टपणे घेतोय. मी त्यांना तुरुंगात मुद्दाम भेटायला गेलो होतो. 2009 ते 2014 या काळात त्यांनी माझ्या मतदारसंघासाठी एक रुपयाही दिला नाही. 2014 च्या निवडणुकीत माझ्या पराभवासाठी भुजबळ जबाबदार आहेत,' असा आरोप धस यांनी केला.

Suresh Dhas
Beed crime news : 'खोक्या'कडून सुरेश धसांना डब्बे भर भरून हरणांचे मांस जायचे; मुंडेंच्या आरोपांनी खळबळ

भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मी माझ्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधीसाठी प्रयत्न करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मी त्यांना निधी मागायला गेलो तर ते म्हणायचे 'सही'.

मी सरळ साधामाणूस, अजितदादांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी सही करण्यात आला. माझी सही पहिलीच होती. मी सही करत असताना छगन भुजबळांच्या मुलाने, पुतण्याने पाहिले, असे देखील सुरेश धस यांनी सांगितले.

भुजबळांनी मला निधी न दिल्याने 2014 माझा पराभव झाला. तेच माझ्या पराभवाला जबाबदार आहेत. त्यांनी माझं राजकीय नुकसान केलं, म्हणून मी त्यांच्यावर नाराज आहे. त्यांना भेटायला जाऊनही मी मनातली खंत बोलून दाखवली, असंही धस म्हणाले.

मी खून्नस काढणार

छगन भुजबळांचा काय सांगता? ते फार खुनशी वागतात. म्हणून मी खुन्नस काढून त्यांना भेटायला गेलो. मी भुजबळांविरोधात केव्हाही खुन्नस काढणारच. मला त्यांच्याबद्दल रागच आहे. पाडलं ना मला त्यांनी. माझी 5 वर्षे वाया घालवली. मग भुजबळांबद्दल गोड बोलायचं का?' असा प्रश्न देखील धस यांनी केला.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Suresh Dhas
Harsvardhan Sapkal In Sadbhavana Rally : संतोष देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, त्यांच्या नावासमोर 'शहीद' असा उल्लेख हवा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com