Congress On Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना 'मतदान जिहाद' विधान भोवणार; काँग्रेसच्या तक्रारीवर फौजदारी होणार?

Congress Complains About Kirit Somaiya Voting Jihad Statement : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मतदान जिहाद या विधानावर अमरावती काँग्रेसने सिटी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात देखील किरीट सोमय्या यांनी असेच विधान केले होते.
Congress On Kirit Somaiya
Congress On Kirit Somaiyasarkarnama
Published on
Updated on

Congress Vs Kirit Somaiya : भाजप नेते खासदार किरीट सोमय्या यांनी विधानसभेच्या मतदारांना जिहादी म्हणून संबोधले होते. दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात 'मतदान जिहाद' झाला, असे गंभीर आरोप केला होता.

यानंतर अमरावती निवडणुकीत देखील, असेच 'मतदान जिहादी' वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले होते. किरीट सोमय्या यांना याच विधानावरून काँग्रेसने कात्रीत पकडले आहे. अमरावती काँग्रेसने सिटी कोतवाली पोलिसांकडे तक्रार केली आहे.

किरीट सोमय्या यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना मतदारांना जिहादी म्हणून संबोधले होते. यावर आता काँग्रेस (Congress) आक्रमक झाली आहे. असे विधान करून जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतू दिसून येतो. त्यामुळे अशा विकृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अमरावती काँग्रेसने सिटी कोतवाली पोलिसांकडे केली आहे. हा मतदारांबरोबर लोकशाही आणि निवडणूक आयोगाचा अपमान आहे, असा देखील ठपका काँग्रेसने तक्रारीत ठेवला आहे.

Congress On Kirit Somaiya
Mahayuti News : महायुतीत भाजपच मोठा भाऊ; शिंदे गटातील नेत्याचा स्वपक्षीयांना घरचा आहेर

लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळ देखील नियुक्त झालं असून कामकाज सुरू झालं आहे. परंतु निवडणूक काळात झालेल्या विधानावरून वाद सुरूच आहे. या वादाला हवा दिली जात आहे. उकरून काढले जात आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील अमरावती विधानसभा मतदारासंघात किरीट सोमय्या यांनी केलेल्या विधानाचा मुद्दा काँग्रेसने उकरून काढला आहे. हा मुद्दा उकरून काढल्याबरोबरचत नवीन वादाला तोंड फुटले आहे.

Congress On Kirit Somaiya
Chandrasekhar Bawankule : आप मनमानी करते हो, या पठ्यान भाजप प्रदेशाध्यक्षांना सुनावलं

अमरावती काँग्रेसने फक्त पोलिसांकडे किरीट सोमय्यांविरोधात तक्रार देऊन थांबलेली नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार दाखल केली आहे. अमरावती शहरासह संपूर्ण देशात जातीय दंगल घडवण्याचा हेतू अशा विधानांमधून दिसतो. त्यामुळे यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने तक्रारीद्वारे केली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी असे विधान अमरावती येथेच केले नव्हते, असे देखील समोर येत आहे. मुंबईतील मुंबादेवीमध्ये निवडणुकीच्या काळात असे विधान केल्याचे समोर आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांचा मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात विजय झाला आहे. या मतदारसंघात मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात मतदार जिहाद झाल्याचा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केला. यामिनी जाधव यांना बूथ 191 मध्ये केवळ एकच मत मिळालं आहे. अरविंद सावंत यांना 311 मतं मिळाली आहे. हा कोणता प्रकार आहे, असा आक्षेप घेत किरीट सोमय्या यांनी विधान केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com