Chandrasekhar Bawankule : आप मनमानी करते हो, या पठ्यान भाजप प्रदेशाध्यक्षांना सुनावलं

BJP in Nagpur district : सोमवारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतला. विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला.
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar BawankuleSarkarnama

Nagpur News : लोकसभेत झालेल्या पराभवानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यशैलीवर रोष वाढत चालला आहे. नागपूर जिल्ह्यातील नेते आता उघडपणे विरोधात बोलायला लागले आहेत. सोमवारी रामटेक विधानसभा मतदारसंघात झालेल्या आढावा बैठकीत एका माजी आमदाराने प्रदेशाध्यक्षांना ‘आप मनमानी करते हो...‘ अशा शब्दात सुनावले. नंतर चूक लक्षात आल्यानंतर त्याने माफी मागितली आणि तुम्ही आमचे ऐकत का नाही असे म्हणायचे होते असे सांगून सारवासारव केली.

सोमवारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतला. विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. लोकसभेच्या निवडणुकीत झालेला चुका टाळा, आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचा सल्ला त्यांनी सर्वांना दिला. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 

भाजपात हजारो कार्यकर्ते असताना बाहरेच्या उमेदवाराला महायुतीत का घेण्यात आले. याचा काय फायदा झाला. उमेदवार निवडण्यापूर्वी सर्वांना विश्वासात का घेतले नाही. पक्षात शेकडो निष्ठावान कार्यकर्ते आहेत. वर्षानुवर्षांपासून ते पक्षासाठी राबत आहेत. त्यांचा कधी विचार करणार आहात की नाही ? असा प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. यात एका माजी आमदाराने आप मनमानी करते हो असे म्हणताच बैठकीत खळबळ उडाली. चुकीचा शब्दाचा वापर झाल्यानंतर त्याने तुम्ही आमचे ऐकत का नाही ? अशी सुधारणा केली असल्याचे समजते. या बैठकीला सुमारे हजार कार्यकर्ते उपस्थित होते. यापैकी काही जणांशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. पक्षांतर्गत बैठक होती. कुरबुरी, राजी नाराज होतच असते असे एकाने सांगितले.

Chandrasekhar Bawankule
TDF On Nashik Teachers Legislative Elections : संस्थाचालकांना आमदारकी मिरवण्यासाठी हवी; गृहमंत्रालयाच्या हस्तक्षेपावर 'TDF'ची आगपाखड

रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत राजू पारवे यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठी नाराजी होती. अनेकांनी विरोध केला होता. भाजपच्या एका माजी जिल्हा परिषद सदस्याने बंडखोरी केली होती. पारवे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन आपला विरोध दर्शवला होता. निवडणुकीच्या प्रचारातून अनेकांनी अंग काढून घेतले होते. याचा व्हायचा तो परिणाम निवडणूक निकालावर झाला. महायुतीचा उमेदवार पराभूत झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com