Haryana Assembly Result 2024 : हरियाणातील पराभव कुणामुळे? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं सांगितलं कारण

Congress Haryana Assembly Result: हरियाणात काँग्रेसचेचं सरकार येईल, असं भाकीत सर्व एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात येत होते. मात्र, निकाल हाती येताच सर्वांच्या पदरी निशारा हाती आली आहे.
Mallikarjun Kharge| Rahul Gandhi
Mallikarjun Kharge| Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Congress News: हरियाणात काँग्रेसला सत्तेत येण्याची अपेक्षा होती. ‘एक्झिट पोल’मध्येही तशा पद्धतीचे संकेत मिळाले होते. मात्र, निकाल हाती येताच चित्र पालटलं. काँग्रेसला 37 जागा मिळाल्या. तर, भाजपनं आपलाच रेकॉर्ड मोडित काढत एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसच्या अपयशानंतर पक्षात वाद सुरू झाले आहेत. मात्र, आमच्याच गोंधळामुळे हरियाणात काँग्रेसचा पराभव झाला, असं विधान काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं आहे.

हरियाणात सुरूवातीच्या कलामध्ये काँग्रेसनं (Congress) आघाडी घेतली होती. मात्र, 11 वाजल्यापासून चित्र बदललं आणि भाजपनं आघाडी घेतली. ती आघाडी निकाल हाती येईपर्यंत कायम होती.

भाजपला 48 जागा मिळाल्या. तर, काँग्रेसनं फक्त 37 जागा मिळवल्या. काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळेच ही परिस्थिती ओढावल्याचं बोललं जातं. यावर काँग्रेस नेते, बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे.

“हरियाणात आमच्याच पक्षानं गोंधळ घातला. महाराष्ट्रात असा काहीही गोंधळ नाही. हरियाणात काँग्रेसच्याच गोंधळामुळे पराभवाला सामोर जावं लागलं. महाराष्ट्रात एकदम स्थिर पद्धतीनं काँग्रेस चालली आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्ष एका विचाराने काम करत आहेत. तसेच, विधानसभेला महाविकास आघाडीच्या 180 हून अधिक जागा निवडून येतील,” असा विश्वास बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला आहे.

Mallikarjun Kharge| Rahul Gandhi
Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : विखे-थोरातांमध्ये जुंपली; थोरातांनी आव्हान देताच, मंत्री विखेंनी मक्तेदारीवरच...

दरम्यान, हरियाणातील काँग्रेसच्या पराभवानंतर माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) संतापल्याचं पाहायला मिळाले. काँग्रेसच्या विजयापेक्षा नेते स्वत:चे हितसंबंध जपण्यात गर्क होती, अशी नाराजी राहुल गांधी यांनी गुरूवारी झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केल्याचं समजते. या बैठकीला कुमारी शैलजा, रणदीप सुरजेवाला, तसेच कॅप्टन अजय यादव यांना बोलवण्यात आलं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com