Mumbai News : विधानसभा निवडणूक अवघ्या दीड महिन्यांवर आली आहे. महाविकास आघाडीने, विशेष करून काँग्रेसने यावेळी देखील महायुतीला रोखण्याचा चंग बांधलाय. परंतु या दोघांसमोर जागा वाटपाचं दिव्य असणार आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षांकडे इच्छुकांची संख्या डझनवारीने दिसते. त्यामुळे प्रत्येक पक्षांत नाराजींची संख्या अधिक असणार.
काँग्रेसने यावर साधव भूमिका घेत महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी 10 वरिष्ठ नेत्यांच्या समितीची घोषणा केली. या समितीच्या माध्यमातूनच महाविकास आघाडीतील घटक पक्षासोबत जागा वाटपाबाबत चर्चा करत राहील. काँग्रेसने ही समिती लगेचच कार्यरत केली असून विधानसभा निवडणुका होईपर्यंत काम करत राहणार आहे.
काँग्रेसने (Congress) जाहीर केलेल्या 10 जणांच्या समितीमध्ये महाराष्ट्र प्रदेशच्या 7 नेत्यांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, डाॅ. नितीन राऊत, आरिफ नसीम खान, सतेज पाटील यांच्यासह मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे खासदार वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि असलम शेख यांचा समावेश समितीत करण्यात आला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे होणारा, धुरळा उडणार आहे. बहुरंगी लढत प्रत्येक मतदारसंघात दिसणार आहे. जिंकण्यापेक्षा पाडापाडीचे राजकारण अधिक होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट सामना रंगणार असल्याने त्याला लोकसभा निवडणुकीची किनार असणार आहे.
काँग्रेस, भाजप (BJP), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचित, शेतकरी संघटना, कामगार संघटना, माकप आदी पक्ष संघटना आपपाले राष्ट्रीय नेते निवडणुकीच्या प्रचारात रिंगणात उतरतील. ही निवडणूक राज्यातील दोन पक्ष फुटीनंतर होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर होत असल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत जिरवाजिरवी अधिक होईल, त्यामुळे फक्त विजयाची हमी असलेल्या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार दिसेल, असे नियोजन सर्वच पक्षांकडून केले जात आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्ष आपपाल्याकडे सर्वाधिक जागा खेचण्याच्या तयारी आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण रंगणार आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसने याबाबत समिती स्थापन करून आघाडीतच आघाडी घेतल्याचे दिसते. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी गेल्या आठवड्यात चर्चा झाली. या चर्चेत महाविकास आघाडीच्या जागा वाटप निश्चित झाली आहे. परंतु काही जागांवर तिढा कायम आहे. या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने समितीची घोषणा केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीला लवकरात लवकर उमेदवार जाहीर करून प्रचारा लागण्याची रणनीती महाविकास आघाडीने पु्हा आखल्याचे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.