Hindutva Politics : '...हिंदुत्ववादी नव्हे दहशतवादीच, नकली वारकरी', काँग्रेस आक्रमक; भोसले, भंडारेंवर प्रहार!

Congress Harshvardhan Sapkal Sangrambapu Bhandare : कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. हिंतुत्वादी संघटनांच्या आडून टीका करणाऱ्यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
Congress leader Harshvardhan Sapkal slams Godse supporters, says it reflects a terrorist mindset.
Congress leader Harshvardhan Sapkal slams Godse supporters, says it reflects a terrorist mindset.Sarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांनी संगमनेरमधील घुलेवाडीतील येथील किर्तनामध्ये झालेल्या वादानंतर थेट काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना आम्ही नथूराम गोडसेजी होऊ, अशी धमकी दिली. या धमकीनंतर बाळासाहेब थोरांतांनी उत्तर दिले. मात्र, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून भाजपच्या अध्यामिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले याने देखील थोरातांच्या विरोधात विधाने केली आहेत.

नथुराम गोडसेचे नाव घेत धमकी देणाऱ्या संग्रामबापू भंडारे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. 'ज्या व्यक्तीच्या मुखात आपसूक नथुराम'जी' गोडसे असा उल्लेख येतो, त्याला 'हिंदुत्ववादी' नव्हे दहशतवादीच म्हणायला पाहिजे', असा हल्लाबोल काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

सोशल मीडियावर पोस्ट करत सपकाळ म्हटले आहे की, 'आपल्या संत परंपरेला सोडून राजकीय प्रचार करणाऱ्या दलालासारखी आणि एखाद्या गावगुंडासारखी भाषा वापरणाऱ्या या समाजकंटकांना महाराज आणि कीर्तनकार म्हणजे आपल्या थोर संतपरंपरेचा अपमान आहे.'

Congress leader Harshvardhan Sapkal slams Godse supporters, says it reflects a terrorist mindset.
Rahul Gandhi Politics: सावरकरांवरील वक्तव्य; राहुल गांधींच्या खटल्यात वकिलांनी शोधली नामी शक्कल, खटला होऊ शकतो बाद?

'आजपर्यंत कोणत्या संत-महात्म्याने जीवे मारण्याची धमकी दिली? याचाच अर्थ हे वारकरी संप्रदायात घुसलेले नकली वारकरी आहेत, जे समाजात द्वेषाचं विष पेरून एका विशिष्ट राजकीय विचारधारेसाठी सुपाऱ्या वाजवण्याचं काम करतात.', असा आरोप देखील सपकाळ यांनी केला.

थोरात 'अ‍ॅक्शन मोड'वर

भंडारे यांच्या धमकीनंतर बाळासाहेब थोरात हे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी भंडारेंना प्रतिआव्हान देत नथूराम गोडसे समोर आल्यावर विचार आणि तत्त्वांशी तडजोड न करता आनंदानं बलिदान स्वीकारील, असे म्हटले. तसेच संगमनेर तालुक्यातील अखंड हरिनाम सप्ताहांच्या किर्तनांना हजेरी लावत ते विरोधकांना सूचक इशारा देखील देत आहेत.

Congress leader Harshvardhan Sapkal slams Godse supporters, says it reflects a terrorist mindset.
Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: 'बेस्ट'मध्ये पराभव, 24 तासांत राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! बंद दाराआड चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com