Balasaheb Thorat : निवडणूक आयोगाची प्रेस; थोरात म्हणाले, 'जनतेच्या पैशातून महायुती सरकारचा राजकीय प्रोपोगंडा'

Balasaheb Thorat criticized the mahayuti government : काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी महायुती सरकारवर निशाणा साधला.
Balasaheb Thorat 1
Balasaheb Thorat 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने काही वेळातच जाहीर करणार आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे नेता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या जागाबाबत मोठं विधान केलं आहे.

"निवडणुका होतील की नाही, असा संभ्रम असतानाच जनतेच्या पैशातून महायुती सरकारने राजकीय प्रोपोगंडा करून घेतला. असू देत, पण महाविकास आघाडीची निवडणुकीची तयारी पूर्ण असून, जागा वाटप देखील फायनल होत आलं आहे आणि महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल", असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका (Elelction) होणार नाही, असं महाविकास आघाडीतील दिग्गज नेते सुरवातीला सांगत होते. यातच हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुका झाल्या. निकाल लागले. महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या निवडणुकीत नेहमी बरोबर होतात. परंतु यावेळी असं झालं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका होणार नाही, असे वाटत होते. मविआच्या नेत्यांनी यावरून केंद्र, राज्य आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते.

Balasaheb Thorat 1
Kolhapur Politics : 'मविआ'तील इच्छुकांची धाकधूक वाढली; मतदार संघाच्या अदलाबदली...

काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते असे भाकीत वर्तवले होते. यातच हरियाणाच्या निवडणुकीचा जाहीर झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्र दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले. या दौऱ्यानंतर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि राज्याच्या विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी निवडणूक होईल, असे सांगितले.

Balasaheb Thorat 1
Election Commission : वेळापत्रक जाहीर करण्याआधी निवडणूक आयुक्तांचे EVM बाबत मोठं विधान; म्हणाले...

निवडणूक आयोग आज दुपारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील निवडणुकांविषयी घोषणा करणार आहे. तत्पूर्वी बाळासाहेब थोरात यांनी निवडणुकांविषयी, मविआच्या जागा वाटपाविषयी आणि राज्यातील सत्ता परिवर्तनावर भाष्य केले.

बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले

"राज्यात निवडणूक प्रक्रिया होत आहे. संदिग्धता होती की, निवडणूक होणार की नाही, ही निवडणूक त्यांनी खूप पुढं नेली. सरकारने या कालावधीत जनतेच्या पैशातून राजकीय प्रोपोगंडा करून घेतला. असे असले, तरी महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. जागा वाटप देखील या आठवड्यात पूर्ण होणार आहे. तसंच महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल", असा दावा देखील बाळासाहेब थोरात यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com