Kolhapur Politics : 'मविआ'तील इच्छुकांची धाकधूक वाढली; मतदार संघाच्या अदलाबदली...

Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूरमध्ये जागा आणि उमेदवार अदलाबदलीचे संकेत असल्याने महाविकास आघाडीतील इच्छुकांना कोणत्या मतदार संघातून तयारी करायची हा प्रश्न पडला आहे.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक जागा काँग्रेसकडे जाणार असल्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वीच जागा आणि उमेदवार अदलाबदलीचे संकेत दिल्यानंतर दहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेसला (Congress) जाणार असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील एकेक जागा कमी होणार आहे. दोघांनाही प्रत्येक दोन जागा आणि काँग्रेसला सहा जागा जाणार असल्याने राधानगरी, शिरोळ आणि इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील इच्छुक बुचकुळ्यात पडले आहेत. विद्यमान चार जागा काँग्रेसकडे राहणार असल्याने राधानगरी शिरोळ, इचलकरंजी यातील दोन जागा या काँग्रेसला जाणार आहेत.

Kolhapur Politics
Kolhapur Political Crime : पोलिसानेच रचला शिवसेना शहाध्यक्षाच्या खुनाचा प्लॅन; पन्नास लाखांचे जप्ती प्रकरण

राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाकडे जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर शिरोळ मतदार संघातून शिवसेना ठाकरे पक्षाकडे घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. इचलकरंजी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने प्रचाराला सुरवात केली आहे. मात्र या दोन दिवसांच्या घडामोडीनंतर आणि व्हाट्सअपवर जागा वाटपाचा स्क्रिनशॉट फिरत असल्याने या मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून असलेले इच्छुक बुचकळ्यात पडले आहेत. वरिष्ठ स्तरावर काय हालचाली घडत आहेत यापासून इच्छुकांना अलिप्त ठेवण्यात आले आहे.

Kolhapur Politics
Laxman Dhoble ; माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंवर भाजप सोडण्याचा समर्थकांचा दबाव; काय आहे कारण?

महाविकास आघाडीतील उमेदवार निश्चित झाले असले दोन-तीन मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार, याबाबत अद्याप निश्चित नाही. शिरोळ मतदार संघावर शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची नजर आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघ अदलाबदल करून हा मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे घेण्याचे तयारी करत असल्याची माहिती आहे. इचलकरंजी विधानसभा मतदार संघात काँग्रेसकडून हालचाली केल्या जात आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात हे चित्र स्पष्ट होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. प्रचारापासून ते निवडणुकीच्या निकालापर्यंत उमेदवारांना केवळ 30 दिवसच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत आघाडीतील मधील काही जागावाटप आणि उमेदवार निश्चिती अद्याप झालेली नाही.

शिवसेना ठाकरे गटाकडून शिरोळमध्ये माजी आमदार उल्हास पाटील यांची तयारी सुरू आहे. राधानगरीमध्ये देखील माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील आणि राहुल देसाई यांनी देखील शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र ऐन वेळी हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची हालचाली सुरू आहेत. त्याबाबतचे स्क्रिन शॉट समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये ही घालमेल सुरू झाल्याचे पाहायला मिळते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com