Congress : काँग्रेसनं बरचं काही ठरवलं; 'या' मुद्यावर महायुती सरकार घालवण्याचा निश्चय!

Congress Delhi meeting discusses election campaign and issues :दिल्ली इथं झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत चार राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्यांवर चर्चा झाली. संविधान बचाव आणि जातीनिहाय जनगणना हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे असणार आहेत.
Congress 1
Congress 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-कश्मीरमध्ये या चार राज्यांच्या निवडणुकीला मोठ्या आक्रमकपणे समोर जाण्याचे काँग्रेसने ठरवले आहे.

जातीनिहाय जनगणना, संविधानाचे रक्षण या मुद्यांसह सर्वसामान्यांच्या दैनंदिन मुद्यांवर महाराष्ट्रातील महायुती सरकारचा सत्तेतून पाडाव करण्याचा निर्धार काँग्रेस केला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीच्या पक्ष मुख्यालयात विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, प्रभारी आणि काँग्रेस समितीमधील प्रमुख सदस्यांची महत्त्वाची बैठक झाली. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-कश्मीर या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची रणनीतीवर चर्चा झाली. प्रचार आणि प्रचाराची दिशा कोणत्या मुद्यांवर ठेवायची याचा उहापोह या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

Congress 1
Partition Horrors Remembrance Day: पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली; फाळणीच्या स्मृती जागवल्या...

लोकसभा निवडणूक भाजपने 'अब की बार 400' पारची घोषणा दिली होती. ही घोषणा कशासाठी होती, याचा धागा पकडत काँग्रेसने भाजपला लोकसभा निवडणुकीत घेरलं. भाजपला संविधानात बदल करण्यासाठी 400 पेक्षा जास्त जागा पाहिजेत, असे सांगत संविधान बचावची भूमिका घेतली. काँग्रेसने (Congress) संविधान बचावचा हा मुद्दा आजही लावून धरला आहे. या मुद्यामुळे अल्पसंख्याक, दलित, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, मागासवर्गीय मतदार पुन्हा काँग्रेसकडे आकर्षित झाला आहे. हाच मुद्दा पुन्हा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत लावून धरण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे.

Congress 1
Yogi Adityanath : पाकिस्तान नष्ट होणार की भारतात विलीन..! योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा

महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. देशातील इतर भागातील समाजांकडून आरक्षणाची मागणी होत आहे. यावर काँग्रेसच्या बैठकीत खल झाला. यावरून जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा पुढे आला. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भाजपने जात काढली. परंतु राहुल गांधी यांनी त्यावर सत्ताधाऱ्यांना माफ केले. याच लोकसभेत राहुल गांधी यांनी देशात जातीगणना होणारच आणि महाविकास आघाडी सरकार हे करणार असल्याचा मुद्दा रेटला. हाच जातीगणनेचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत हत्यार बनवण्याचा निर्णय काँग्रेसच्या बैठक झाला.

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीला मुस्लिम व दलित-आदिवासींनी मते दिली, याचे आभार काँग्रेसने सांगितले. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्येही मतदारांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. तसेच अनुसूचित जातींमध्ये वर्गीकरण करून कोट्याअतंर्गत कोटा निश्चित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या संवेदनशील आणि गंभीर राजकीय सामाजिक मुद्यावर काँग्रेसने मात्र वेगळी भूमिका मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com