Ladki Bahin Yojana fund misuse : प्रिय, राज्य निवडणूक आयोग..; काँग्रेस म्हणतंय, 'पत्रास कारण की...'

Congress Writes to State Election Commission Over BJP Mahayuti Ladki Bahin Yojana Fund Distribution in Civic Polls : माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वितरीत करण्यावरून काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावरून भाजपने संताप व्यक्त केला आहे.
Ladki Bahin Yojana fund misuse
Ladki Bahin Yojana fund misuseSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra municipal election controversy : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे, आज आणि उद्या सोमवारी माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा निधी वितरीत करण्याचा, सत्ताधारी भाजप महायुतीची योजना आहे.

यामुळे राज्यातील एक कोटी मतदानावर परिणाम होईल, राज्य निवडणूक आयोगाने यात लक्ष घालून, हा लाभाचा निधी निवडणुकीनंतर वितरीत करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. भाजप महायुती यावरून काँग्रेसवर संतापली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. पण राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या पत्राची दखल घेतली आहे.

काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध नसल्याचे अगोदरच स्पष्ट केलं आहे. परंतु वैयक्तिक लाभाची ही योजना आहे. सत्ताधारी भाजप (BJP) महायुतीने राज्यातील महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे, आज रविवारी आणि उद्या सोमवारी लाभाचा निधी वितरीत करण्याचा नियोजन केले आहे. या थेट निवडणुकीवर परिणाम होण्याची भीती काँग्रेसने पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

भाजप महायुतीने डिसेंबर आणि जानेवारीचा, असा एकूण तीन हजार रुपयांचा लाभ एकत्रित देण्याचं ठरवलं आहे. माहितीनुसार काही जिल्ह्यात निधीचं वितरण देखील झालं आहे. यावर काँग्रेसने (Congress) राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून लक्ष वेधलं आहे. ही एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे. लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही. या योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच वितरीत करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे काँग्रेसने केली आहे.

Ladki Bahin Yojana fund misuse
Rahul Narwekar Controversy : नार्वेकरांच्या 'आप'ने वाढवल्या अडचणी, आहेत तीन तक्रारी; संजय सिंह म्हणाले, 'न्यायालयीन लढाई...'

निवडणूक आयोगाकडून दखल

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने या पत्राची दखल घेतली असून, त्यावर उत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या तक्रारीवर विचार करू, असं आयोगानं उत्तर दिलं आहे. त्यामुळं आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देणार याकडे लक्ष लागंल आहे. परंतु काही जिल्ह्यात लाभाचा निधी वितरीत झाल्याचे समोर येत आहे.

Ladki Bahin Yojana fund misuse
Top 10 News : काँग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन.., शिक्षकांची धडधड वाढली, झिरवाळांच्या मतदारसंघातच सापडला प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

मंत्री बावनकुळे यांचा संताप

काँग्रेसच्या या पत्रावर भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरला आहे. तो वरचेवर उफाळून येतो. आमच्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला व काँग्रेस नेत्यांना बघवत नाही, असा टोला लगावला आहे. नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा, आता सर्वांसमोर आली असल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले.

ठाकूर यांचं जोरदार प्रत्युत्तर

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या टीकेवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, "चंद्रशेखर बावनकुळे यांना कमी लिहिता वाचता येत असावं. पत्रामध्ये असं लिहिला आहे की, लाडक्या बहिणीचे पैसे मतदान झाल्यानंतर द्या, तसंही लाडक्या बहिणीचे पैसे हे तीन महिन्यानंतर उशिरा देतात. महिलांना जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा तुम्ही देत नाही आणि आता निवडणुकीच्या समोर तुम्ही पैसे देत आहे, हे बरोबर नाही." कोणती विचारधारा जहर पसरवत आहे, हे सर्व जग बघत आहे. पूर्ण युवा पिढी भाजपवाल्यांनी खराब करून टाकली, असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com