Karad Politics : कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात, उंडाळकरांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे अडचण

Karad South Udaysingh Patil Undalkar Joins NCP : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी केले.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

संभाजी थोरात

Congress Politics : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड दक्षिण मतदार संघात काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकीय वारस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंडाळकर यांनीच काँग्रेसला रामराम केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता आहेत.

राज्याची स्थापना झाल्यापासून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्व यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी केले. 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या डॉ. अतुल भोसले यांनी तब्बल 39 हजार मतांच्या फरकाने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला आणि काँग्रेसची परंपरा खंडीत केली.

Congress
Narayan Patil : ‘आदिनाथ’च्या निवडणुकीत बागल गटाबरोबरच भाजपच्या ‘बड्या नेत्या’नेही मदत केली; आमदार नारायण पाटलांचा गौप्यस्फोट

विधानसभा निवडणुकीनंतरही काँग्रेसची पडझड सुरच आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत चांदे या दोन दिग्गजांनी काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश केला. 2024 विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रमुख शिलेदार असलेल्या उदयसिंह पाटील यांच्याकडे 2029 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून बघितले जात होते. तेच चव्हाण यांचे राजकीय वारस असतील असे चित्र होते.

मात्र स्वतः उदयसिंह पाटील यांनीच जोरदार शक्तीप्रदर्शन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या काँग्रेसमध्ये विभाजन झाले. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर नगरपालिकेतही भाजपाच्या बांधणीमुळं काँग्रेस अडचणीत आली आहे. मलकापूरचे नेते मनोहर शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अवघ्या दोन वर्षात झालेल्या घडामोडीमुळं 1953 पासून केंद्र आणि राज्यातील उच्चपदे भूषवलेल्या चव्हाण परिवाराची बिकट अवस्था झाली आहे.

Congress
Sandeep Deshpande : मनोमिलनाच्या गोड चर्चा सुरु असतानाच मनसे नेत्याने करुन दिली कटू आठवण, म्हणाले त्यावेळी उद्धव ठाकरे पहिल्या मजल्यावरुन..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com