Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजना बंद करा, कुणी आडवले...' काँग्रेस आमदार संतापला

Congress MLA Nitin Raut : सामाजिक न्याय विभागाच्या मे महिन्यापू्र्वी 410 कोटीचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आला होता. पुन्हा 410 कोटीचा निधी मे महिन्यात वळवण्यात आला.
Congress On Ladki Bahin Yojana
Congress On Ladki Bahin Yojana Sarkarnama
Published on
Updated on

CM Ladki Bahin Yojana News : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. महायुतीला एकतर्फी विजय मिळाला. लाडकी बहीण योजनेमुळे आता विकासकामांसाठी निधी नसल्याचे आरोड होते आहे. या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र, लाडक्या बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आला आहे.

अनुसूचित जातीसाठी असलेल्या तब्बल 410 कोटींचा निधी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. त्यामुळे सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी 'तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी निधी नसेल तर योजना बंद करा.', असे सुनावले.

योजना बंद करण्यापासून तुम्हाला कोणी आडवले आहे, असा टोला देखील राऊत यांनी लगावला. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यावर देखील त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच जर लाडकी बहीण योनजा सुरू ठेवायची असेल तर अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र तरदूत करा, असा सल्ला देखील दिला.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देखील आपल्या विभागाचा निधी वळवल्याने संताप व्यक्त केला होता. अजित पवार आपल्या विभागाचा निधी परस्पर वळवत असल्याचे त्यांनी म्हटले होते. आपल्याकडे निधी नसल्याचे ते म्हणाले होते.

Congress On Ladki Bahin Yojana
MNS Politics : मनसेचा घसरणारा टक्का उद्धव ठाकरेंच्या कामी येईल का? आकडे खोटं नाही बोलतं!

820 कोटी कोंटीचा निधी वळवला

सामाजिक न्याय विभागाच्या मे महिन्यापू्र्वी 410 कोटीचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आला होता. पुन्हा 410 कोटीचा निधी मे महिन्यात वळवण्यात आला. त्यामुळे आत्तापर्यंत सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 820 कोटी पेक्षा अधिक निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे.

आदिवासी विभागाला फटका

सामाजिक न्याय विभागासह आदिवासी विभागाचा विभागाचा निधी देखील लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी असलेला निधी वळवून सरकार अन्याय करत असल्याची टीका समाजिक कार्यकर्ते करत आहेत.

Congress On Ladki Bahin Yojana
Hasan Mushrif: हसन मुश्रीफ सापडले राजकीय धर्मसंकटात, युतीधर्म पाळणार की मित्राची साथ देणार..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com